Talwar Baba : बिलोलीत तलवारबाबाचा दरबार पोलिसांनी उधळला

अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या भोंदूचा पर्दाफाश; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवरही गुन्हे
Talwar Baba
Talwar Baba : बिलोलीत तलवारबाबाचा दरबार पोलिसांनी उधळलाfile photo
Published on
Updated on

Police Disrupt 'Talwar Baba's' Gathering in Biloli

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आणि गोरगरीब जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या भोंदूगिरीला नांदेड पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. बिलोली तालुक्यातील बडूर येथे स्वतःला तलवार बाबा म्हणवून घेणाऱ्या ज्ञानेश्वर करडे याच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. अंगात येण्याचा बनाव करून आणि तलवारीचा धाक दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या या भोंदूचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Talwar Baba
Parbhani Crime: फटाक्यांच्या वादातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू; बोरीतील बाजारपेठा बंद

पोलिसांच्या कारवाईत समर्थकांचा अडथळा

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर व पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी कारवाई सुरू केली असता, आरोपीचे समर्थक शिवकांत मैलारे आणि नबाजी वाघेकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे, तर पोलिसांची फिर्याद फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी या सर्वांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अंनिसकडून कारवाईचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कारवाईचे स्वागत केले आहे. समाजात भीती पसरवून आर्थिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या अशा भोंदू बाबांना वेळीच रोखणे गरजेचे आहे, असे समितीचे कमलाकर जमदाडे यांनी म्हटले आहे.

Talwar Baba
Chatrapati Sambhajinagar Crime : निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

असा उघडला भोंदूगिरीचा दरबार

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर करडे हा गेल्या चार वर्षांपासून बडूर येथे स्वतःचा दरबार भरवत असे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो आजारपण दूर करणे, कौटुंबिक प्रश्न सोडवणे किंवा करणी-बाधा काढण्याच्या नावाखाली लोकांना जाळ्यात ओढत असे. विशेषतः महिलांना मंतरलेले लिंबू देऊन आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे व वस्तूंची लूट केली जात होती.

पोलिस प्रशासनाचे आवाहन भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी पडू नका. विज्ञानाची कास धरा आणि आपली फसवणूक होत असल्याचे जाणवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे, ती नष्ट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा.-
अतुल भोसले, पोलिस निरीक्षक, बिलोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news