Crime News : अश्पाक पटेल गँगची नशा उतरवली !

पोलिसांचा सिंडिकेटला सुरुंग : किराडपुऱ्यातून आणखी पाच ड्रग्ज माफिया गजाआड तुटवडा होताच गुजरातहून मागविलेल्या ३ हजार सिरप बाटल्या जप्त.
sambhajinagar crime news
Crime News : अश्पाक पटेल गँगची नशा उतरवली !file photo
Published on
Updated on

3,000 syrup bottles ordered from Gujarat have been seized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमली पदार्थाविरोधात कठोर भूमिका घेतल्याने ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. सलग होत असलेल्या कारवायांमुळे नशेच्या बाजारात मालाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नशेखोरांकडून सिरपची मागणी वाढल्याने आणि शहरात माल मिळत नसल्याने एका माफियाने या संधीचे सोने करण्याचे ठरवले. चढ्या भावाने विक्री करून लाखो रुपये कमावण्यासाठी त्याने थेट गुजरातहून ३ हजार बाटल्यांची मोठी खेप मागवली.

sambhajinagar crime news
पहिले मराठी वैद्यकीय साहित्य-संस्कृती संमेलन छत्रपती संभाजीनगरात

त्याला वाटले पोलिस शांत झाले आहेत, पण तिथेच त्याचा घात झाला. कुख्यात ड्रग्ज माफिया अश्पाक पटेल याने जिन्सी आणि सिटी चौक परिसरात सुरू केलेल्या नशेच्या सिंडिकेटला पोलिसांनी पुन्हा मोठा सुरुंग लावला. मंगळवारी (दि.३) किराडपुरा भागात केलेल्या कारवाईत पाच तस्करांना बेड्या ठोकून सिरपचा साठा जप्त केला.

ओबेदुल्ला अब्दुल्ला खान (३२, रा. किराडपुरा, मूळ रा. मालेगाव), शेख सोफियान शेख नजीर (३४, रा. बायजीपुरा), अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान (३१, रा. जिन्सी ठाण्याजवळ), शेख नावेद शेख हमीद (२५, रा. फाजलपुरा) आणि शेख अव्याज ऊर्फ शेरू शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, प्रभारी निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. आरोपींना न्यायालयाने फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ३ फेब्रुवारी रोजी रहेमानिया कॉलनीतील ओबेदुल्ला अब्दुल्ला याच्या घरी रात्री छापा टाकला. यावेळी घरात कोडीन कफ सिरपचा ३ हजार सीलबंद बाटल्यांचा साठा आढळून आला.

sambhajinagar crime news
गुंठेवारी नियमितीकरणाकडे मालमत्तधारकांची पाठ

पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, प्रभारी निरीक्षक संभाजी पवार, एपीआय रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रवीण वाघ यांच्या पथकाने केली. गेल्या काही दिवसांत पटेल गंगशी संबंधित पेडलर्सवर गुन्हे शाखेने सलग चार कारवाया करत सुमारे १२ हजारांहून अधिक नशेच्या सिरप बाटल्या आणि ११ ड्रग्ज माफियांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मागविला माल सलग कारवायांमध्ये ड्रग्ज माफियांचे पोलिसांनी कंबरडे मोडले आहे. मुख्य पेडलर्स जेरबंद झाले तर कुख्यात अश्पाक पटेलसह अनेक जण भूमिगत झाले.

नशेसाठी सिरपची डिमांड वाढल्याने आणि शहरात माल मिळत नसल्याने ओबेदुल्ला याने चढ्या भावाने मोठी उलाढाल करण्याच्या उद्देशाने हिम्मत करून दोन दिवसांपूर्वी गुजरात येथून १२ लाखांच्या ३ हजार कोडीन सिरपच्या बाटल्या मागविल्या होत्या, मात्र गुन्हे शाखेने त्याचा डाव उधळवून लावला. यापूर्वी त्याने दोन ते तीन वेळा मोठ्याप्रमाणात माल मागवून विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.

बंद मेडिकलच्या नावावर मागविला माल

ओबेदुल्ला याचे बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी शहागंज भागात मेडिकल सुरू केले होते. एक फार्मसिस्ट ठेवून त्याचे लायसन्स तो वापरत होता, मात्र फार्मासिस्ट निघून गेल्यानंतर त्याचे मेडिकल बंद पडले. मात्र प्रोप्रायटर हाच असल्याने त्याने त्यावरच गुजरातहून सिरपचा माल मागविणे सुरू केले होते.

पटेल गँग अन् तेजा कनेक्शन

या सिंडिकेटचे धागेदोरे कुख्यात माफिया अश्पाक पटेल आणि हर्सल जेलमध्ये असलेल्या तेजाच्या टोळीशी जोडले गेले आहेत. अटक केलेला शेख अय्याज ऊर्फ शेरू हा तेजाचा चुलता असून, तेजा जेलमध्ये असताना त्याचे नातेवाईक आणि पंटर पुन्हा सक्रिय झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अश्पाक पटेलसह त्याचे अनेक साथीदार सध्या भूमिगत असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

फ्लॅट घेऊन थाटला अड्डा, सिंडिकेटला पुरवठा

ओबेदुल्ला याने किराडपुरा भागात भाड्याने फ्लॅट घेऊन तिथे सिरपचा साठा केला होता. शहा बाजार भागातील कुख्यात अश्पाक पटेल, शेख हाफिज, शेख कलीम, अविनाश पाचुंदे, शेख सोहेल शेख सत्तार ऊर्फ चाऊ, सरफराज मिर्झा, दाऊद खान, शेख अय्याज ऊर्फ शेरू यांना अनेकदा नशेच्या बाटल्यांची विक्री केल्याची कबुली दिली. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news