

One killed on the spot after being hit by a bike at a toll booth
तामसा, पुढारी वृत्तसेवा
तामसा येथून नांदेडकडे जाणारी मोटारसायकल तामस्याजवळ असलेल्या टोलनाक्याच्या बॅरीकेडस्वर आदळून झालेल्या अपघाताता मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दि. २० रोजी रात्री अंदाजे दीडच्या सुमारास हा अपघात झाला असून सतीश बारसे (वय ३६) असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, या अपघाताला जबाबदार धरून रुद्राणी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विरोधात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील सतीश सुरेशराव बारसे (वय ३६) यांचा तामसा येथील बसस्थानक परिसरात आंध्रा इडली सेंटर नावाचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे व्यावसायिक कामासाठी सतीश बारसे हे गुरुव ारी दि. २० नोव्हेंबर रोजी मोटारसायकलने नांदेडला गेले होते. रात्री उशिरा पर्यंत आटोपून ते तामसा गावाकडे परत निघाले. प्रवासात तामसा जवळील चालू असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील रुद्रानी इन्फास्ट्रक्चर कंपनीचे टोल नाक्याचे काम चालू आहे. कामाच्या ठिकाणीही दिशादर्शक फलक नाहीत. तसेच टोलनाक्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे करून ठेवलेले आहेत. वाहनधारकांना हे खड्डे जवळ येईपर्यंत दिसत नाहीत.
नांदेडहून मोटारसायकलवर तामस्याकडे निघालेल्या सतीश बारसे यांना देखील टोलनाक्यावरील खड्डे व बॅरीकेडस् दिसले नाहीत. रात्री उशिरा बारसे यांची मोटारसायकल या बॅरिकेडस्वर आदळून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रुद्रानी कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा अपघात घडल्याची भावना झाल्याने तामसा येथील नागरिकांनी रोष व्यक्त करीत प्रॉजेक्ट मॅनेजर धोंडिबा जांभळे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन वारसे यांनी मध्यस्थी करून प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.