Indian Roller bird sighting Nanded| नीलपंखाच्या मोहक दर्शनाने पर्यटक भारावले

त्याच्या पंखांचा रंग आणि उडण्याची शैली पाहून पर्यटक भारावून गेले आहेत
Indian Roller bird sighting Nanded| नीलपंखाच्या मोहक दर्शनाने पर्यटक भारावले
Published on
Updated on

प्रशांत भागवत

उमरखेड : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सध्या अनेक वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक जंगल सफारीसाठी विविध अभयारण्यांना भेट देत आहेत. विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरील पेनगंगा अभयारण्य येथेही पर्यटकांची मोठी गर्दी होत असून वन्यजीवांसह विविध पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करत आहे. यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहे तो निळ्या पंखांचा देखणा पक्षी — Indian Roller अर्थात नीलपंख किंवा चाष.

Indian Roller bird sighting Nanded| नीलपंखाच्या मोहक दर्शनाने पर्यटक भारावले
Nanded news | पैनगंगा अभयारण्यात ‘ज्युली’चे दर्शन; जंगल सफारीला पर्यटकांची वाढती पसंती

जंगलातील शांत वातावरण, पालापाचोळ्याची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवाईने नटलेल्या रानात अचानक नजरेस पडणारा नीलपंख पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. निळ्या, फिरोजी आणि जांभळट रंगांच्या छटांनी सजलेले त्याचे पंख जंगलाच्या वातावरणात अधिकच मोहक वाटतात.

Indian Roller bird sighting Nanded| नीलपंखाच्या मोहक दर्शनाने पर्यटक भारावले
Sagareshwar Sanctuary : सागरेश्वर अभयारण्यात हरणांचा मुक्त संचार

अलीकडे सफारीसाठी आलेल्या काही वन्यजीवप्रेमींना नीलपंखाचे अत्यंत जवळून दर्शन झाले. सफारीदरम्यान हा पक्षी काही अंतर पुढे उडत जाऊन पुन्हा एखाद्या सुकलेल्या फांदीवर येऊन बसत होता. पर्यटक शांतपणे त्याचे निरीक्षण करत असल्याचे पाहून तोही काही वेळ निवांत थांबला. या अनुभवाबद्दल एका पर्यटकाने सांगितले की, “जंगलात वाघ, हरिण किंवा इतर वन्यप्राणी पाहण्याची उत्सुकता असतेच; पण नीलपंखासारखा सुंदर पक्षी इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. त्याच्या पंखांचा रंग आणि उडण्याची शैली पाहून आम्ही भारावून गेलो.”

Indian Roller bird sighting Nanded| नीलपंखाच्या मोहक दर्शनाने पर्यटक भारावले
Indian Pitta bird: पावसाचे संकेत देणारा ‌‘इंडियन पिट्टा‌’ रायगडमध्ये; कर्नाळा जंगलात घुमतोय आवाज

भारतीय संस्कृतीत शुभ मानला जाणारा नीलपंख हा केवळ सुंदर पक्षी नसून जंगलाच्या जैवविविधतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे जंगल सफारीदरम्यान पर्यटक त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी विशेष उत्सुक दिसून येत आहेत. जंगलातील नाद, रंग आणि पक्ष्यांचे हे मुक्त जीवन अनुभवण्यासाठी पैनगंगा अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news