

NCP candidate joins BJP at Nanded
मुदखेड, पुढारी वृत्तसेवा: मुदखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून राजकीय वातावरण वर चेवर गरम होत आहे. यातच माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आमदार चिखलीकर यांना जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे. प्रभाग क्रमांक सहामधील राष्ट्रवादी राष्ट्रवादा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कैलास सुरणे यांनी भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातच मुदखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सहामधील राष्ट्रवादीचे उमेदवार कैलास सुरणे यांनी अचानक भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या उपस्थितीत सुरणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विजय येवणकर, प्रवीण गायकवाड, सुनील शेटे, सचिन चंद्रे माधव कदम, प्रकाश बलफेवाड, संतोष सावंत, गजानन कमळे, डॉ. माणिक जाधव आदी उपस्थित होते. नदिड भाजपचे चाणक्य मानले जाणारे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी थेट राष्ट्रवादीचाच उमेदवार भाजपमध्ये सामील करून घेतल्याने हा चिखलीकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी प्रवेश : कैलास सुरणे
मी कसल्याही धमकीला किंवा आमिषाला बळी पडलो नसून, केवळ विकासाच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याचा आणि सभागृहाचे काम योग्यरीत्या करण्याचा विश्वास मला दिला आहे. त्यांच्या याच शब्दावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया प्रभाग क्र. ०६ मधील उमेदवार कैलास सुरणे यांनी दिली.