

Navratri festival begins today
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : गणोशोत्सवानंतर मंडळांना विशेषतः महिलांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. या उत्सवाला सोमवारी (दि. २२) घटस्थाननेने सुरुवात होत आहे. त्यानिमित्त प्रभागा प्रभागांत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप उभारले असून रंगीबेरंगी रोषणाईने गरबा व दांडियाची व्यवस्था अंतिम टप्प्यामध्ये आहे. दरम्यान रविवारी (दि. २१) बाज-ारपेठेत दुर्गादेवीच्या मूर्ती खरेदीसह पूजेचे साहित्य घेण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली.
नवा मोंढा येथील मैदानावर यंदा एकता नवरात्र-ोत्सव मंडळाच्या वतीने तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला जात आहे. ४० वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यावेळी जपली आहे. या मंडळामधअये ५५० कार्यकर्ते यासाठी पुढाकार घेतात.
यासोबतच रास-दांडियाचेही आयोजन केले जात असून, दोन हजारावर महिला, तरुण-तरुणी यात सहभागी होतात. शिवाय दहाही दिवस दररोज महाप्रसादाचे वाटपासोबतच सामाजिक उपक्रमही घेत असल्याचे माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, मंडळाचे अध्यक्ष नवल पोकर्णा, अनिल मुंदडा आदींनी सांगितले आहे.
सोमवार, दि. २२ : पांढरा
मंगळवार, दि. २३ : लाल
बुधवार, दि. २४ : निळा
गुरुवार, दि. २५ : पिवळा
शुक्रवार, दि. २६ : हिरवा
शनिवार, दि. २७ : करडा
रविवार, दि. २८ : नारिंगी
सोमवार, दि. २९ : मोरपंखी
मंगळवार, दि. ३० : गुलाबी