

Nanded Z.P. Reservation of groups
विशेष प्रतिनिधी
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सोळा पंचायत समित्यांच्या गट आणि गणांचे आरक्षण सोडतीद्वारे सोमवारी निश्चित झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील माजी सदस्यांपैकी अनेकांना संरक्षण मिळाले तर काहीच्या बाबतीत अवलक्षण पडले. जि.प.च्या प्रवाहात प्रथमच येऊ पाहणाऱ्यापैकी काहीना आरक्षण सोडतीनंतर दिलासा मिळाला.
नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी आधीच निश्चित झाले होते. जिल्ह्यातील काही राजकीय पार्श्वभूमीच्या विदर्भकन्यांकडे कुणबी (मराठा) जातीचे प्रमाणपत्र असल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये होत्याच, शिवाय मराठवाड्याच्या काही भूमिकन्यांनीही हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेत वरील जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले असल्यामुळे त्याही स्पर्धेमध्ये आल्या, त्यांतील मधुमती राजेश कुंटूरकर (कुंटूर), नाईक पराण्याशी संबंधित माजी अध्यक्ष वैशाली चव्हाण (बाताळी) यांचे गट ओचीसी (महिला) प्रवर्गाला सुटले आहेत. भाजपा आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यवती पूनमताई तसेच शिवराज पाटील होटाळकर बांच्या पत्नीकडे कुणबी (मराठा) प्रमाणपत्र असले, तरी त्यांना दुसरा गट शोधावा लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रात एकही गट ओबीसी (महिला) प्रणर्गासाठी सुटलेला नाही, पण भोकर विधानसभा मतदारसंघात तीन गट ओबीसी प्रवर्गासाठी असून त्यापैकी खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांनी पूर्वी रामतीर्थ गटाचे प्रतिनिधित्व केले, या गटाचे आता अटकळी असे नामकरण झाले असून हा गट ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. जि.प.च्या माजी अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांना भोकर तालुक्यातील भोसी गटाचा पर्याय आहे तर माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना एफलारा किंवा पेठवडज हे दोन पर्याय आहेत.
आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र शोधावा लागणार आहे. नायगाव तालुक्यात नरसी आणि मांजरम हे दोन महत्त्वाचे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे त्या भागातील सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांचर गंडांतर आले. माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर, माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांना आपापल्या गटामध्ये संरक्षण मिळाले आहे. नायगाव तालुक्यातील बरबड़ा गट सर्वसाधारण (महिला) झाल्यामुळे तेथेही मोठी चुरस निर्माण झाली आहे, नायगावच्या चव्हाण कुटुंबातून कोणी समोर आलेच तर त्यांना बरबडा आणि कुंटूर या दोन गटांचा पर्याय असल्याचे सांगण्यात आले.
मुखेडच्या राठोड परिवाराला सोयीचे असलेले जांब आणि सावरगाव हे दोन्ही गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या परिवारातील महिलेला घेट वान्हाळीमध्ये वैशाली चव्हाणांना आव्हान देण्याची संधी आहे. माजी पदाधिकारी सदस्यांपैकी पुरूषोत्तम घोडगे, संजय भोसीकर, श्रीनिवास मोरे, दिनकर दहीफळे, ज्योतिबा खराटे, लक्ष्मण उकरवाड यांना आपल्या भागामध्ये पर्याय उपलब्ध आहेत. पण माजी सभापती निसाळे गुरुजी, शिवराज पाटील होटाळकर यांना मात्र स्वतः साठी सोयीचा गट नाही.
भोकर मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव (महिला) आणि लहान-येळेगान हे दोन्ही गट सर्वसाधारण प्रवर्गात तर मुदखेड तालुक्यात मुगर, बारड हे दोन्ही गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. भोकर तालुक्यात भोसी (एस. टी. महिला), पाळन (ओबीसी) तर पिंपळळव सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे.
बारड मुगट गट ओबीसीसाठी राखीव मुदखेड तालुक्यातील बारठ व मुगट जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मराठा समाजातील प्रस्थापितांचे राजकीय मनसुबे उद्ध्वस्त झाले असून इतर मागासवर्गीय असणाऱ्या विस्थापितांमध्ये उमेदवारीवरुन आता खल सुरू झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भोकर मतदारसंघातील महत्वपूर्ण असलेले बारड व मुगट असे दोन्ही गट इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव घोषित झाल्याने अनेक प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे.
परंतु ओचीसी प्रवर्गाला सुटलेल्या आरक्षणात तालुक्यातील काही प्रस्थापित घुसखोरीही करू शकतात, त्यामुळे खा. अशोक चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण गांना उमेदवारी देताना ताकही फुंकून प्याये लागणार आहे. अन्वधा त्याचे जिल्हाभर राजकीय पडसाद उमटू शकतात.
मूळ ओबीसीवर अन्याय नको! आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी प्रवर्ग सतर्क असून मूळ ओबीसी प्रवर्गाला उमेदवारी नाकारु नये आणि असे झाल्यास आमचे राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. तेव्हा त्याचे वाईट परिणाम जिल्हाभर उमटू शकतात याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी अशी तीव्र प्रतिक्रिया तालुक्यातील ओबीसी गटाचे सरपंच मन्मथ मेळगावे यांनी दिली आहे.
आ. श्रीजया चव्हाण यांच्यासाठी सुरक्षितता। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवे नेतृत्व डोके वर काढणार नाही, याची काळजी खा. अशोक चव्हाण यांना घ्यावी लागणार आहे. आ. श्रीजया चव्हाण यांना डोकेदुखी ठरू नये व भविष्यात त्यांच्या विरुद्ध आलान उभे राहणार नाही अशा प्रकारची सुरक्षितता खा. चव्हाण घेऊ शकतात.