

नायगाव : नायगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आठ गणांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) तहसील कार्यालय, नायगाव येथे जाहीर करण्यात आली. ही सोडत प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड आणि नियंत्रण अधिकारी, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता पार पडली.
आरक्षण पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले –
१) बरबडा – खुला (महिला)
२) कृष्णूर – सर्वसाधारण (अनुसूचित जाती)
३) कुंटूर – नामनिर्देशित मागास प्रवर्ग (महिला)
४) देगाव – सर्वसाधारण (महिला)
५) मांजरम – नामनिर्देशित मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
६) टेंभुर्णी – सर्वसाधारण
७) नरसी – अनुसूचित जाती (महिला)
८) मुगाव – सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीनुसार नायगाव तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली आहे. एकूण आठ गणांपैकी चार गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न या आरक्षण प्रक्रियेत दिसून आला. आरक्षण जाहीर होताच राजकीय वर्तुळात चुरस निर्माण झाली असून, विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आता उमेदवारीसाठी हालचाली सुरू करण्याच्या तयारीत आहेत.