

Nanded Zilla Parishad President's post reserved for OBC woman
नांदेड, पुढारी वृत्तसेवा ध
नेगाव आणि लहान या अनुक्रमे नांदेड व अर्धापूर तालुक्यातील दोन गट वाढल्यानंतर ६५ सदस्यांच्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. १२) मुंबईत पार पडली. त्यात नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलेसाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला सदस्य सौ. मंगाराणी आंबुलगेकर ह्या मावळत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. तत्पूर्वी शांताबाई जवळगावकर ह्या अध्यक्ष होत्या. या जिल्हा परिषदेची मुदत दि. २१ मार्च २०२२ रोजी संपली, तेव्हापासून प्रशासक राज सुरु आहे. त्याला आता बरोबर साडे तीन वर्ष झाली. शुक्रवारी मुंबईत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांची आरक्षण सोडत पार पडली. त्यानुसार नांदेडमध्ये आता पुन्हा महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी ३ ठिकाणी ओबीसींना संधी मिळणार असून पैकी नांदेड व जालना येथील अध्यक्षपद महिलांसाठी सुटले आहे. तर हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सुद्धा ओबीसीसाठी सुटले आहे. तिथे परिस्थितीनुसार महिलेची वर्णी लागू शकते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण गटासाठी तर लातूर व धाराशीव सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत.
परभणी अनुसूचित जाती तर बीड अनुसूचित जाती महिलेसाठी रााखीव झाले आहे. नांदेड जिल्हा परिषदेत यापूर्वी सुद्धा ओबीसी अध्यक्ष झाले. त्यात लोहा तालुक्यातील संभाजीराव धुळगंडे यांच्यावर अविश्वास आणण्यात आला होता. त्यानंतर बाबाराव एंबडवार यांनी दोन वेळा अध्यक्षपद भूषविले. तर सौ. वैशाली स्वप्नील चव्हाण या सुद्धा २००७ मध्ये नदिड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. आता पुन्हा एकदा ओबीसी महिला अध्यक्षा असतील, परंतु जिल्हा परिषद मावळलेली असल्यामुळे चेहरा अनभिज्ञ आहे.
गटांच्या पुनर्रचनेनंतर धनेगाव (ता. नांदेड) व लहान (ता. अर्धापूर) हे दोन गट वाढल्याने पूर्वीच्या ६३ संख्येवरुन आता ६५ सदस्यांची जिल्हा परिषद असेल. त्यात २७टक्के आरक्षणानुसार १७.५५ अर्धात १८ सदस्य पैकी निम्मे म्हणजे ९ सदस्य महिला असतील. त्यापैकी एकाची वर्णी अध्यक्षपदी लागेल.