Mahavitaran महावितरणमध्ये दिव्याखालीच अंधार...

वरिष्ठ यंत्रचालकाच्या घरातच वीज चोरी : संबंधिताला केले निलंबित
Mahavitaran News
Mahavitaran महावितरणमध्ये दिव्याखालीच अंधार... file photo
Published on
Updated on

Senior officials of Mahavitaran revealed to be stealing electricity

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बहुतांश ग्राहक महावितरणचे वीज बिल नियमितपणे भरत आहेत. परंतु, महावितरणमधीलच वरिष्ठ अधिकारी वीजेची चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सदर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, दिव्याखालीच अंधार असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Mahavitaran News
Marathwada University : 'स्वाराती' मराठवाडा विद्यापीठामध्ये 'प्रभारीराज'

वास्तव्यास देगलूर नाका परिसरात असणारे आणि महावितरणच्या कंधार ३३/११ केव्ही उपकेंद्रात वरिष्ठ यंत्रचालक पदावर नोकरीस असणारे सलीम चाँद सय्यद यांनी त्यांच्या रहात्या घरात चोरून वीज वापरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने त्यांना महावितरणच्या नोकरीतून निलंबित केल्याची माहिती परिमंडल कार्यालयाने कळविली आहे.

सलीम चाँद सय्यद यांनी त्यांच्या देगलूर नाका, खुशरो नगर नांदेड येथील राहत्या घरात वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व्हिस वायरला टॅपिंग करून ४ लाख ४८ हजार ६०९.३१ रुपयांच्या विजेची चोरी केल्याचे वीज चोरी पथकास आढळून आले. तपासणी व पंचनाम्यांती सलीम चाँद सय्यद व त्यांचा किरायदार सय्यद लतीफ सय्यद अथर या दोघांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार फिर्याद दिली होती. त्यानुसार बीएनएसच्या कलम १७३ अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Mahavitaran News
आधी शिक्षण मग संघकार्यात सक्रिय, विद्यार्थिदशेतील मित्रांनी सांगितल्या मोहन भागवत यांच्या आठवणी...

गुन्हा दाखल झालेल्या दोंघापैकी एक सलीम चाँद सय्यद हे महावितरणमध्येच कंधार वीज उपकेंद्रात वरिष्ठ यंत्रचालक पदावर नोकरीस असल्याने व त्यांच्याकडून वीजचोरीसारखे गैरकृत्य घडल्याने त्यांच्यावर महावितरणच्या परिमंडल कार्यालयाकडून ९ सप्टेंबर रोजीच्या आदेशाव्दारे निलंबित करण्यात आले आहे.

वरातीमागून घोडे...

महावितरण सर्वसामान्य ग्राहकांना नियमित वीज बिल भरणा करण्याचे आवाहन करत आहे. त्याला प्रतिसादही चांगला आहे. परंतु, दिव्याखालीच अंधार म्हटल्याप्रमाणे महावितरणमधीलच वरिष्ठ अधिकारी वीजेची चोरी करत आहेत. त्यामुळे नियमित, वीज बिले भरावीत, विजेचा अधिकृतपणे वापर करावा या मुख्य अभियंता राजाराम माने यांचे आवाहन कितपत सत्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news