Nanded Water Scarcity : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा सुरू

बोअर आटले, विहिरी कोरड्या; प्रशासन हतबल
Nanded Water Scarcity
Nanded Water Scarcitypudhari photo
Published on: 
Updated on: 

रमेश पांडे

नांदेड : रखरखते उन्ह, बोअर आटले, विहिरी, नदी-नाले कोरडेठाक, अशा परिस्थितीत ऑक्टोबरच्या दुसर्‍याच आठवड्यात शहर व जिल्ह्यात पाणीी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात चारा-पाणी टंचाईचा सामना कसा करायचा, हा यक्ष प्रश्न उभा आहे.

राज्य शासनाने जिल्ह्याील 14 तालुके दुष्काळग्रस्त म्हणूून जाहीर केले, संबंधित तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी व पंचनामेही पूर्ण झाले, परंतु अद्याप या तालुक्यांना दुष्काळी मदत मिळालेली नाही. दसरा तोंडावर आला आहे,परंतु शासनाला अद्याप मदत वाटपाचा मुहूर्त सापलाच नाही. दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे शासनाच्यावतीने आश्वासने दिली जात असली तरी शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहे.

Nanded Water Scarcity
Yermala Yedeshwari Devi Temple : विद्युत रोषणाईने उजळले येडेश्वरी मंदिर

उन्हाचे तीव्र चटके आणि उष्ण हवामान यामुळे रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच जमीनीतील पाणी पातळी प्रचंड खोलवर गेल्यामुळे घरोघरी असलेले बोअर आणि ग्रामीण भागात असलेले सार्वजनिक हातपंप बंद पडले आहेत. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला असून पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.

ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी नाही हा तर विषय आहेच, पण या नागरिकांना पिण्यासाठी आणि जनावरांची तहान भागवण्यासाठी सुद्धा पाण्याची टंचाई असताना शहरात मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. नांदेड शहरात चार दिवस आड पाणी पुरवठा होत आहे, परंतु अनेक वस्त्यांमध्ये नळाचे पाणी नाल्याद्वारे वाहताना दिसून येते. पाणी जपून वापरा असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आवाहन केले असले तरी पाण्याच्या बेसुमार वापरावर नियंत्रण ठेवले जात नाही, ही बाब चिंताजनक आहे.

Nanded Water Scarcity
Jalna Water Conservation : तलाव दुरुस्तीवर पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च

सर्वसामान्य नागरिकांसह वन्य पशुप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत असल्याने पाण्यच्या शोधात वन्यप्राणी मानवीवस्त्यांकडेे धाव घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बांधकामांवर बेसुमार वापर

एकीकडे तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न असताना दुसरीकडे शहरात टोलेजंग इमारतींची मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. शिवाय नवीन बांधकांमासाठीही हातोहात परवाने वाटपाचे प्रकार जोमाने सुरू आहेत. बांधकामांवर पाण्याचा बेसुमार वापर रोखण्यासाठीही मनपा प्रशासन कठोर निर्णय घेणार का? हा प्रश्न आहे.

अनेक वस्त्यांमध्ये नळाचे पाणी नाल्यात

नांदेड शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नळाचे पाणी रस्त्यावर तसेच नाल्यांमध्ये सोडून देण्याचे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. तासन्‌तास पाणी वाया जात असतानाही नळ बंद करण्याचे औदार्य कोणीही दाखवत नाही.टंचाईच्या व दुष्काळी स्थितीत महानगर पालिका प्रशासनाचेे या प्रकारावर नियंत्रण नाही. त्यामुळे पाण्याचा कुठे सुकाळ, तर कुठे दुष्काळ ही स्थिती निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news