Jalna Water Conservation : तलाव दुरुस्तीवर पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च

गत दोन वर्षांत ३८ पाझर तलावांची दुरुस्ती, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक दुरुस्तीचे कामं, यंदाही जिल्ह्यात होणार ८७ कामे
Jalna Water Conservation
Jalna Water Conservationpudhari photo
Published on: 
Updated on: 

संघपाल वाहूळकर

जालनाः गतवर्षी जालना जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला होता. पावसाप्रमाणेच जलसंधारणाच्या कामांचाही सुकाळ पाहायला मिळाला. सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या दोन वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या माध्यमातून सुमारे ३८ पाझर तलावांची दुरुस्ती झाली. या दुरूस्तीवर दोन वर्षात सुमारे ४ कोटी २४ लाख ७१ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला. यंदा मात्र पावसाने मोठी ओढ दिली असल्याने त्या पाझर तलावात यंदा अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, यंदा पावसाने मारलेल्या ओढीमुळे जिल्ह्यात भीषण कोरड्या दुष्काळाची छाया गडद झाली असून विहिरी, कूपनलिका आणि लघु-मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही पाण्याचा टिपूसही न साठल्याने निधीचा सदुपयोग झाला की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Jalna Water Conservation
Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाच्या चारच महिन्यांत विवाहितेने जीवन संपवले?

जिल्हा वार्षिक योजनेच्या ल.पा. योजना बांधकाम व दुरुस्तीअंतर्गत गेल्या दोन आर्थिक वर्षांत पाझर तलावांची गळती काढणे आणि दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. सन २०२४-२५ मधील मध्ये मंठा आणि अंबड तालुक्यातील ११ प्रमुख कामांसाठी एकूण १०५ लाख रुपये (१ कोटी ५ लाख रुपये) खर्च करण्यात आले. यामध्ये बेलोरा पाझर तलाव क्रमांक ५, ६ आणि ८, बेलोरा तांडा, रानमळा, कोकरसा, माहोरा, पांगरी गोसावी, ढोकसाळ तसेच जोगेश्वरवाडी व गंगाराम तांडा येथील तलावांचा समावेश आहे.

तर सन २०२५-२६ मधील टप्प्यात घनसावंगी, मंठा, परतूर, बदनापूर व अंबड तालुक्यातील २७ कामांसाठी तब्बल २६४.७१ लाख रुपये (२ कोटी ६४ लाख ७१ हजार रुपये) निधी खर्ची पडला आहे. यामध्ये रवना, घोंसी बु., राजेगाव, घनसावंगी, कुं.पिंपळगाव, पारडगाव, बोलेगाव, वलखेड, पांडेपोखरी, तुपेवाडी, दोदडगाव यांसारख्या विविध गावांतील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

Jalna Water Conservation
Nashik | दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत नाशिकचे आणखी तीन तालुके

गेल्या दोन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधकाम व दुरुस्तीच्या कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे आणि पाणी साठवणक्षमता वाढवण्याच्या कामांवर विशेष भर देण्यात आला. यंदा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तब्बल ८७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जलसंधारणाची कामे मार्गी लागतील.

दोन वर्षांत पाझर तलावाचे तालुकानिहाय कामे

  • मंठाः बेलोरा तांडा, बेलोरा (पाझर तलाव क्र. ५, ६, ८ आणि इतर दुरूस्ती कामे), रानमळा, कोकरसा, माहोरा, पांगरी गोसावी, ढोकसाळ, पांगरी गोसावी, वाई, तळणी, तळेगाव, माळकिणी, माळतोंडी, अंभोरा कदम, खोराडसावंगी,

  • अंबडः जोगेश्वरवाडी, गंगाराम तांडा, दोदडगाव.

  • घनसावंगीः रवना, घोंसी बु., राजेगाव पाझर तलाव क्रमांक १, २, घनसावंगी, कुं.पिंपळगाव, घोंसी, करडगाववाडी, मंगूजळगाव, ढाकेफळ पाझर तलाव क्रमांक १, २, पारडगाव, बोलेगाव, मोहपूरी.

  • परतूरः वलखेड, पांडेपोखरी, हातडी. मोहपुरी या गावांमध्ये पाझर तलाव व पा.त. क्र.०१ ते ०४ च्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

  • बदनापूरः तुपेवाडी.

जोत्याखालील लघु प्रकल्प

तालुका - प्रकल्प

जालना - ५

बदनापूर - २

भोकरदन - ७

जाफराबाद - २

अंबड - १०

घनसावंगी - ८

मंठा - ४

परतूर - ४

एकूण - ४२

यंदा ८ तालुक्यांत होणार ८७ जलसंधारणाची कामे

गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तब्बल ८७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जवळपास १८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सर्वाधिक २१ कामे घनसावंगी तालुक्यात होणार असून, परतूर १७, जालना १८, भोकरदन ११, मंठा ७, अंबड ६, बदनापूर ५ आणि जाफ्राबाद तालुक्यात २ कामे निविदा प्रक्रियेद्वारे पूर्ण केली जाणार आहेत. यात पारंपरिक जलस्रोतांची दुरुस्ती, मूळ क्षमता पुनरुज्जीवित करणे, तसेच नाला खोलीकरण, रुंदीकरण, सिमेंट नाला बंधारे आणि गाळ काढण्याची कामे जलसंधारण विभागाकडून केली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news