Mineral Water Price Hike | दुष्काळाच्या झळा बसण्यापूर्वीच पाण्याचे दर वाढले; सिडकोत मिनरल वॉटर महागले

साधे पाणी १५ रुपये, तर थंडगार पाण्यासाठी २५ रुपये मोजावे लागणार
Mineral Water
Mineral Water Pudhari
Published on: 
Updated on: 

Mineral Water Expensive CIDCO

नवीन नांदेड : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच संभाव्य पाणीटंचाईचे कारण पुढे करत सिडको-हडको परिसरात मिनरल वॉटरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. २० लिटरच्या जारमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून, साध्या पाण्याचा दर १५ रुपये, तर थंडगार पाण्यासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आतापासूनच झळ बसू लागली आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जवळपास शेकडो मिनरल वॉटर विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांबाहेर दरवाढीचे फलक लावण्यात आले असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिकांनी आतापासूनच दरवाढ केल्याचे चित्र दिसत आहे.

Mineral Water
Nanded News: मांडवी ग्रामीण रुग्णालयात ३.२० कोटींचा अपहार; ‘सेवार्थ’ प्रणालीचा गैरवापर, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकाला अटक

दरम्यान, मनपा प्रशासनाकडून सिडको-हडको परिसरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच अनेक भागांतील हातपंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याच्या दरात झालेली वाढ नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

अद्याप उन्हाळ्याला सुरुवातही झालेली नसताना पाण्याचे दर वाढल्याने आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने परिसरातील बंद व नादुरुस्त हातपंपांची तातडीने दुरुस्ती करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.