

Nanded-Waghala Municipal Corporation Election
रमेश पांडे
नांदेड महिंड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पढाल आठवड्यात खा. अजित गोपछडे यांच्या 'अंत्योदय' कार्यालयात घेण्याचे एकीकडे जाहीर झाले असताना दुसरीकडे या पक्षातील प्रभावशाली नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखतींची 'प्रगती एक्सप्रेस' रविवारपासून सुरू केल्याने वा शिस्तप्रिय पक्षातील बेशिस्त समोर आली.
भाजपाच्या प्रदेश शाखेने जिल्ह्यातील दोन्ही राज्यसभा खासदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जबाबदारी सोपविली आहे. खा. अशोक चव्हाण हे जिल्ह्याचे प्रभारी आहेत, तर खा. अजित गोपछडे मनपाच्या निवडणुकीचे प्रमुख आहेत; पण गौपछडे यांच्या अनुपस्थितीतच प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात रविवारपासून पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र सुरू झाल्यानंतर काही जाणत्यांनी पक्षातील असमन्वय समोर आणला.
खा. चव्हाण गेल्या बुधवारपासून संसद अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत आहेत. अधिवेशनाला शनिवार-रविवारी सुटी असतानाही ते आपल्या कर्मभूमीत आले नाहीत; पण मनपा निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती रविवार ते बुध वारदरम्यान निश्चित करून टाकल्या, या मुलाखत सत्रामध्ये ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्यावर्षी भाजपाचे उपरणे गळ्यात घालून घेणारे, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात दुबार प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री द.पां. सावंत त्यानंतर भाजपामध्ये हळूहळू सक्रिय व्हायला लागले; पण प्रदेश भाजपाने त्यांच्यावर अद्याप विशेष जबाबदारी दिली नसली, तरी रविवारच्या मुलाखत सत्रात शिवाजीनगर सहकारी औद्योगिक वसाहतीत सुसज्ज कार्यालय थाटले असून या कार्यालयासमोर भव्य मंडप टाकण्यात आलेला आहे.
रविवारी या कार्यालयात शुकशुकाट होता; पण मुलाखतींच्या निमित्ताने मगनपुरा भागातील प्रगती महिला मंडळाच्या आवारात भाजपातील इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. खा. गोपछडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; पण ते निवडणूक प्रमुख असले, तरी मुलाखतींच्या प्रक्रियेत ते तसेच संघटनमंत्री संजय कौडगे दोघेही नव्हते.
मनपा निवडणुकीसाठी भाजपातील इच्छुकांच्या मुलाखती १३ व १४ डिसेंबर रोजी खा. अजित गोपछडे यांच्या कार्यालयात होणार आहेत, हा संदेश माझ्या वाचनात आला होता. पण त्याबाबतचा प्रत्यक्ष निरोप कोणाकडून मिळाला नाही. दरम्यान रविवारपासूनच दुसऱ्या ठिकाणी मुलाखती सुरू झाल्याचे काही कार्यकत्यांकडून समजले; पण या मुलाखतीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, असे भाजपा नांदेड दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतुक हंबडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर स्पष्ट केले.
वरील मुलाखती सुरू होण्याआधी गोपछडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने एक सूचना जारी केली होती. त्यानुसार भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १३ आणि १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान होतील, असे सर्व संबंधितांना कळविण्यात आले होते. पक्षाचे दोन्ही खासदार, संघटनमंत्री आणि तीन जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्याचे जाहीर झालेले असताना रविवारी दुसऱ्याच ठिकाणी मुलाखती सुरू झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले.
गोपछडेंच्या स्वतंत्र मुलाखती होणारच
खा. अजित गोपछडे यांच्या कार्यालयातून रविवारी दुपारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार १३ आणि १४ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे कळविण्यात आले असून मुलाखती घेणाऱ्यांत सावंत आणि नरेंद्र चव्हाण यांची नावे नाहीत, हे विशेष