Naded News : नांदेड मनपावर यावेळी भगवा फडकविणारच : आ. कल्याणकर

सर्वच जागांवर सक्षम उमेदवार देण्याची शिवसेनेची पूर्ण तयारी
नांदेड मनपावर यावेळी भगवा फडकविणारच : आ. कल्याणकर
Naded News : MLA KalyankarFile Photo
Published on
Updated on

Nanded Municipal Corporation MLA Kalyankar

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड आगामी निवडणुकीत नदिड महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यास आम्ही सज्ज असून सर्व जगावर सक्षम उमेदवार देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी दिली.

नांदेड मनपावर यावेळी भगवा फडकविणारच : आ. कल्याणकर
Agricultural Exhibition : कृषी प्रदर्शनाकडे शेतकऱ्यांची पाठ; मद्यधुंद अधिकाऱ्यामुळे प्रदर्शनात खळबळ

नांदेड उत्तर मनपा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक येथील वामनराव पावडे मंगल कार्यालयात शनिवारी पार पडली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नांदेड शहरामध्ये शिवसेना पक्षाची राजकीय ताकद अधिक असून शिवसेनेकडे नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या एका जागेसाठी चारहून अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी युती होईल, अथवा न होईल ही बाब लक्षात घेऊन स्वबळाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची आढावा बैठक पार पडले की माहिती त्यांनी दिली. जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे या उमेश मुंढे, मंगेश कदम, बळवंत तेलंग, अपर्णा नेरलकर, दर्शनसिंघ संधू, राजू गुंडावार, संतोष माजनवाड, श्याम कोकाटे, धनंजय पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड मनपावर यावेळी भगवा फडकविणारच : आ. कल्याणकर
Sugarcane News : उसाला तुरे फुटले; वजनात दहा टक्के घट होण्याची भीती

यावेळी पुढे बोलताना आ. कल्याणकर म्हणाले की, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन कामे करावीत. राजकीय पक्षांसोबत युती झाली नाही तरी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे.

प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी ४ उमेदवार इच्छुक आहेत. ही संख्या लक्षात घेता नांदेड मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवू, तुम्ही जनतेची कामे करा, असेही त्यांनी सांगितले. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांनी सांगितले की, १५ ते २० दिवसात मनपा निवडणुका लागणार आहेत. बुथ प्रमुखांनी त्याचे नियोजन करून मतदारांशी संवाद साधावा. बोगस मतदार असणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेकजणांनी मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news