Nanded Woman Death | उमरी येथे अतिमद्य प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

उमरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Woman dies
Woman diesPudhari
Published on
Updated on

Woman dies due to excessive drinking Umri

उमरी : उमरी पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या समोर असलेल्या वस्तीतील एका महिलेचा अतिमद्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२१) राञी साडेअकरा वाजता उघडकीस आली.

या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 20 एप्रिल रोजी दिवसभर आणि रात्री दारू व सिंधी पिल्याने अंजली कृष्णा भंडरवाड (वय 25, रा. मुदखेड हल्ली मुक्काम उमरी) ही महिला घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली.

Woman dies
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात...

या प्रकरणी पोलीस आणि नातेवाईकांनी सदर महिलेला सोमवारी राञी उमरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या महिलेला मृत घोषित केले.

या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पोपुलवाड अधिक तपास करीत आहेत.

Woman dies
Nanded Crime : नांदेडात आणखी दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला

अतिमद्य प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्युचे खरे कारण स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. मंगळवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, सायंकाळी सहा वाजेपर्यंत नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news