Nanded Crime : अखेर पोलिसांना गुंगारा देणारा कबूतर पोलिसांच्या जाळ्यात

नांदेड : गँगवॉर मधील प्रमुख शहारुख कबूतर व उबेद जेरबंद
Nanded triple murder case
पकडलेले आरोपी शहारुख कबुतर व उबेद खान.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः शहरात 4 ते 6 एप्रिल दरम्यान एकापाठोपाठ झालेल्या पाच खूनाच्या घटनांनी नांदेडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वेशीवर टांगली गेली होती. गुन्हेगारांनी पोलिसांच्या धाका ऐवजी थेट खाकीलाच आव्हान देण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर, भाग्यनगर हद्दीतील ट्रिपल मर्डरनंतर इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून पोलिसांना हुलकावणी देणारा कुख्यात आरोपी शेख शाहरुख ऊर्फ कबूतर आणि त्याचा साथीदार उबेद खान याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

एप्रिलच्या सुरुवातीलाच अवघ्या 48 तासांत 5 भीषण खून झाले. या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. भररस्त्यात होणारे राडे आणि गँगवॉरमुळे “नांदेडमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?“ असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते. विरोधक आणि सामान्य जनतेतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते.

Nanded triple murder case
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

शहरातील संपूर्ण दहशतीमागे सदा गँग आणि साईलाला गँग यांच्यातील अंतर्गत वर्चस्वाची लढाई असल्याचे समोर आले आहे. 4 एप्रिल रोजी कॅनल रोडवर अर्जितसिंग चव्हाण याची झालेली हत्या हा याच गँगवॉरचा परिणाम होता. हत्या केल्यानंतर कबूतर आणि त्याचे साथीदार भूर्रकन उडून फरार झाले होते. विशेष म्हणजे, फरार असतानाही शाहरुख कबूतर याने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून पोलिसांना आव्हान दिले होते, ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात होता.

पोलिसांवरील टीका आणि वाढता दबाव लक्षात घेता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पाच विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपासात आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख कबूतर आणि उबेद खान हे नांदेडमध्येच लपून बसल्याचे निष्पन्न झाले. 20 एप्रिल रोजी सापळा रचून या दोघांना जेरबंद करण्यात आले.

Nanded triple murder case
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

मुख्य आरोपी साईलाला याला लपण्यासाठी मदत करणाऱ्या मन्मथ मंगरुळे आणि दिग्विजय नारागुडे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खुनाचे सत्र आणि गँगवॉरमुळे डागाळलेली खाकीची प्रतिमा सुधारण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली असून, शहरात मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. गँगवॉर मधील साई लाला गँग चा लिडर साईलाला यांचा पोलीस कसून तपास करीत आहेत. त्यामुळे पोलीस साईलालाचा मागावर असल्याची माहिती ही एलसीबी च्या अधिकाऱ्यांनी दिली.

नांदेड शहराची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गँगला थारा दिला जाणार नाही. ट्रिपल मर्डरमधील फरार आरोपींना अटक करण्यात आली असून, गँगवॉरशी संबंधित असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराची कुंडली तपासली जात आहे.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news