Blackmagic Case : गुप्तधनासाठी चिमुकलीच्या नरबळीची धमकी; विरोध करणाऱ्या आईला मारहाण

वाजेगाव येथील संतापजनक प्रकार : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Digital Superstition
Blackmagic Case : गुप्तधनासाठी चिमुकलीच्या नरबळीची धमकी; विरोध करणाऱ्या आईला मारहाणPudhari Photo
Published on
Updated on

Nanded : Threat of child sacrifice for secret money; Beating up Opposition mother

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी चिमुकल्या मुलीचा नरबळी द्यावा लागेल, अशी अंधश्रद्धा पसरवून एका महिलेला आणि तिच्या बालकाला लक्ष्य करण्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जवळील वाजेगाव येथे उघडकीस आला आहे. नरबळीस विरोध दर्शवणाऱ्या मातेला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Digital Superstition
Nanded Rain : नांदेड, कंधार, लोहा वगळता जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, कहाळा (ता. नायगाव) येथील रहिवासी शबाना खदीर शेख (वय २८) या दि. २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वाजेगाव येथील जामा मशिदीजवळ असलेल्या आपल्या माहेरी आल्या होत्या. यावेळी आरोपी शेख सलीम शेख महेबूब, इरफाना सलीम शेख (दोघे रा. वाजेगाव), शरीफ आणि अन्य एक (दोघे रा. गोकुळनगर, नांदेड) यांनी आपसात संगनमत केले.

घरातील गुप्तधन बाहेर काढण्यासाठी नरबळी देणे आवश्यक असल्याचे सांगत, आरोपींनी शबाना यांच्या मुलीचा नरबळी देण्याचा हट्ट धरला. या अघोरी आणि अमानुष मागणीला शबाना यांनी तात्काळ ठाम विरोध दर्शवला. "मला कसलेही गुप्तधन नको आहे आणि मी माझ्या मुलीचा बळी देवू देणार नाही," असे त्यांनी आरोपींना स्पष्ट बजावले.

Digital Superstition
Yavatmal Crime | पत्नीला वाममार्गाला लावण्याच्या संशयातून आदिवासी महिलेची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित महिला शबाना खदीर शेख यांनी तात्काळ नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या ठाण्यात तक्रारीवरून पोलीस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक काळे या करत असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दाखल गुन्ह्याची व्याप्ती

पोलीस ठाणे : नांदेड ग्रामीण (गु.र.नं. ९१८/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS 2023): कलम ११५ (२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) विशेष कायदा : महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व निर्मूलन अधिनियम सहकलम ३ (२) (३).

आईवर हल्ला आणि धमकी

आपल्या अघोरी योजनेत अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून संतापलेल्या आरोपींनी शबाना यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलीस तक्रार केल्यास जीवे मारण्याची गंभीर धमकीही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news