

देगलूर, पुढारी वृत्तसेवा: भाविकांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर आणि ॲटो रिक्षाची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. १) दुपारी ३.३० च्या सुमारास कारेगावजवळ घडली. जखमींना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Nanded Accident News)
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बिदरहून नांदेडकडे १० भाविकांना घेऊन टेम्पो ( एम एच ४९ ए टी ३६३०) जात होता. तर देगलूरकडून झरीकडे ७ प्रवासी घेऊन रिक्षा (टी एस १६ यु ए ३२७७) जात होती. यावेळी दोन्ही वाहनांची कारेगाव जवळ समोरासमोर धडक झाली. यात १७ प्रवासी गंभीर जखमी झाले.
१) गंगाराम मल्हारी वाघमारे वय- ५५, रा. शिवणी, २) विठ्ठल भीमराव वरसवाड वय-३५ वर्ष, रा. झरी, ३) जालिंदर मारुती गुडमे वय-३६ रा. झरी, ४) मारुती माधवराव भुताळे वय ५०- रा. झरी, ५) शहाजी धोंडीबा झरिकर वय ४५, रा. झरी, ६) गंगाधर रामराव तोटावर वय ४५, रा. पेंडपल्ली, ७) निर्मल सिंग बहादुर सिंग वय ४२, रा. आसनलखुद जि. बरनाल, पंजाब ८) सुरजीतसिंग पुरोहितसिंग वय ६५, रा.कलकेगाव, जि. बरनाल, पंजाब, ९) सुखदेवसिंग मोतासिंग वय ६०, रा. ठडाणा, पंजाब, १०) जयपालसिंग हरावंशलाल वय ६०, रा. भगा, जि. नवाशहर, पंजाब ११) प्रीतम सिंग अमरसिंग वय-८९ गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब १२) कुलवीरकौर कोलवंतसिंग वय-५५, मेवासिंगवाला, कुपुरथाला, पंजाब, १३) सुंदरजीतकौर अवतारकौर वय- ५६, गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब, १४) मोहन सिंग रतन सिंग वय- ६०, रा. यमुना नगर पंजाब, १५) अवतारसिंग प्रीतमसिंग वय-५७ रा, गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब,१६) लक्ष्मीबाई संग्राम वाघमारे वय-५० रा. शिवणी, ता. देगलूर, जि. नांदेड. १७) सुरिंदरकौर सुखदेव सिंग,वय-६० रा.नवाठाणा, कपूर नाला पंजाब.