Nanded crime : झेडपी शिक्षण विभागाला पोलिसांचा धसका; पथक रिकाम्या हाताने परतले

सुनील मोरे आत्महत्या प्रकरण; चौकशीत अधिकाऱ्यांची दांडी
Nanded Crime  News
Nanded crime Newspudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षक सुनील मोरे यांनी दोन चिमुकल्यांसह केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी गेल्या दोन दिवसांपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडकत आहे. मात्र, शिक्षणाधिकारी अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने व इतर अधिकारी गायब असल्याने पोलिसांना सलग दुसऱ्या दिवशीही रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांच्या या फेऱ्यांमुळे झेडपी शिक्षण विभागात प्रचंड घबराट पसरली आहे.

हदगाव तालुक्यातील झेडपी शिक्षक सुनील मोरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून १७ जुलै रोजी दोन मुलांची हत्या करून स्वतः कारसह गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात हदगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded Crime  News
Nanded railway news : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे रूप बदलले

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे आणि त्रासाचे अनेक पुरावे ठेवले आहेत. मोरे यांनी काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत शिक्षणाधिकारी व इतर वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ते तीव्र तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तपासाचा मोर्चा थेट झेडपी शिक्षण विभागाकडे वळवला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी अधिकारी गायब

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २०) जिल्हा परिषदेत धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मोरे यांच्या तक्रारींवर काय कारवाई झाली, याची माहिती पोलिसांनी मागितली. त्यावेळी प्रशासनाने मंगळवारी माहिती देण्याचे आश्वासन दिले होते.

Nanded Crime  News
Jalna agriculture news : टेंभुर्णी कृषी मंडळात रिमझिम पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधान

त्यानुसार मंगळवारी (दि. २१) पोलिस पथक पुन्हा शिक्षण विभागात पोहोचले. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. इतरही अनेक अधिकारी गैरहजर असल्याने पोलिसांना माहितीविनाच माघारी फिरावे लागले.

लवकरच आवश्यक माहिती हस्तगत करू- "आम्ही दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तपासासाठी जात आहोत. अद्याप अधिकृत कागदपत्रे मिळालेली नाहीत. प्राथमिक शिक्षणाधिकारी आजारी असल्याचे सांगण्यात आले. लवकरच आवश्यक ती माहिती हस्तगत केली जाईल. तसेच, मृत शिक्षक सुनील मोरे यांच्या मोबाइल आणि लॅपटॉपचा तांत्रिक तपास सुरू असून, पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे."

प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news