Soybean Purchase | सोयाबीन खरेदीत डागीची मर्यादा १० टक्क्यांपर्यंत वाढवा : आ.केराम यांची पणनमंत्र्यांकडे मागणी

Nanded News | नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीमध्ये सध्या लागू असलेली केवळ २ टक्के डागीची मर्यादा वाढविण्यात यावी
Bhimrao Keram
Bhimrao KeramPudhari
Published on
Updated on

Soybean Procurement Maharashtra

किनवट : नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीमध्ये सध्या लागू असलेली केवळ २ टक्के डागीची मर्यादा वाढवून ती १० टक्के करावी, अशी मागणी किनवट–माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट–माहूर हे डोंगराळ व दुर्गम तालुके असून यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ५४ दिवस सतत पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी व असामान्य हवामानामुळे सोयाबीन पिकात डागीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल व्यापारी दर्जात बसत नाही. सध्याच्या नियमांनुसार २ टक्क्यांपेक्षा जास्त डागी असलेला माल खरेदीस अपात्र ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरून माल परत न्यावा लागत आहे.

Bhimrao Keram
Nanded Railway Scam | वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे गौण खनिज घोटाळा : ईटीएस मोजणी करुन २ महिन्यात अहवाल सादर करा

यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असून, त्यांना हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आमदार केराम यांनी मांडली आहे. नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला असून, वाढलेल्या डागी प्रमाणामुळे हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे बिकट अवस्थेतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्याची २ टक्के मर्यादा वाढवून किमान १० टक्के डागी सोयाबीन खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन नियमांत शिथिलता आणल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news