Nanded Accident News : कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वरांचा मृत्यू

ही घटना गुरुवारी (दि.१९) दुपारी घडली.
Accident News
कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वरांचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

Two bikers die in car collision

हिमायतनगर / नांदेड, पुढारी वृत्तसेवा भोकर राज्य महामार्गावर असलेल्या सरसम गावातील दोन जण हिमायतनगरकडे दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर दुसऱ्याचा नांदेड रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१९) दुपारी घडली. या घटनेत तरुण कारागिराचा मृत्यू झाल्याने सरसम गावावर शोककळा पसरली आहे.

Accident News
दहा दिवसांच्या बाळाला घेऊन सावित्रीची लेक देतेय परीक्षा !

या विषयी अधिक माहिती अशी की, हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावातील रहिवासी दुचाकीस्वार गजानन लक्षमण पांचाळ (३५) व त्याच्यासोबत बसलेले शेतकरी शंकर पंडितराव देशमुख (४२) हे सरसमकडून हिमायतनगरकडे जात होते. गावाजळील महामार्गावर असलेल्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जब्बर धडक दिली.

या अपघातात दुचाकीचालक पांचाळ जागीच ठार झाला. तर मागे बसलेले देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सरसम गावावर शोककळा पसरली आहे.

Accident News
नांदेड जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणातील मास्टरमाइंड निघाला बिहारचा

हिमायतनगर भोकर महामार्गावरील असलेल्या सरसम गावाजवळ अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांकडून अनेक अपघातांच्या घटना घडल्या असून, यात अनेकांचा जीव गेला आहे. या महामार्गावर असलेल्या गावाजवळ गतिरोधक बसवले तर अपघात टळू शकतात. त्यामुळे याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news