Illegal Sand Mining : नांदेडमध्ये वाळू तस्करावर कारवाई, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
Illegal Sand Mining
लिंबगाव पोलिसांनी वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली. pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, पोलिसांनी वाळूमाफियांवर कितीही कारवाईचा बडगा उगारला तरी वाळू तस्करी सुरूच आहे. लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाघी तांडा येथे वाळूचे अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पोलिसांनी जप्त करत, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लिंबगाव येथील पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक पी.सी. बोधनकर, पोलिस कॉन्स्टेबल काझी, टाक, हरविंदरसिंघ यांचे पथक गस्तीवर असताना वाघी रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेसमोर एम एच 04 एफ यू 9829 क्रमांकाचा वाळूची तस्करी करणारा टिप्पर आढळून आला.

Illegal Sand Mining
Nanded New Development Works : नांदेडमधील नवीन कामांच्या वर्क ऑर्डरला खंडपीठाचे निर्बंध

पोलिसांनी वाळूच्या साठ्यासह टिप्पर असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मुदस्सर नजर अब्दुल लतीफ याने दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील सखाराम तारु व विष्णू र्त्यंबक भालेगाव या दोघांविरोधात लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Sand Mining
Manoj Jarange Patil : जूनपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करा; अन्यथा उपोषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news