Illegal Sand Mining Nanded | वाळू माफियांवर मोठी कारवाई : विष्णुपुरी गोदावरी नदीपात्रात छापा; १.५१ कोटींचा मुद्देमाल जप्त

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोन क्रेन, एक जेसीबी, पाच इंजिने, ११ तराफे तसेच २२ ब्रास वाळू असा मोठा मुद्देमाल जप्त
Vishnupuri Godavari River Action
Vishnupuri Godavari River ActionPudhari
Published on
Updated on

Vishnupuri Godavari River Action

नवीन नांदेड : अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि. २२) पहाटे विष्णुपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकण्यात आला. या धाडीत अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन क्रेन, एक जेसीबी, पाच इंजिने, ११ तराफे तसेच २२ ब्रास वाळू असा मोठा मुद्देमाल जप्त केला.

Vishnupuri Godavari River Action
Nanded Police | देगलूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ३.७४ लाखांचे २५ गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन

कारवाईदरम्यान तराफे, इंजिने आणि वाळू घटनास्थळीच नष्ट करण्यात आली, तर दोन क्रेन आणि एक जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेत जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत १ कोटी ५१ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विश्वजित दुधमल, पांडुरंग मोरे, अर्जुन बेटकर आणि विजय देशमुख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस उपनिरीक्षक बेग आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Vishnupuri Godavari River Action
Nanded news | 'देव' उदार झाला, हाती महामंडळरूपी भोपळा दिला

जिल्ह्यात कारवाईची चर्चा

गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. कोटींचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे जिल्हाभर या कारवाईची चर्चा सुरू असून अवैध वाळू व्यवसायाला मोठा आळा बसत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news