Nanded Crime : नांदेड परिक्षेत्रात २२२ गुन्हे दाखल, ३.३१ कोटींचा ऐवज हस्तगत!

पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड :पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात (नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर) १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-४' राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (१ ते ७ ऑक्टोबर) पोलिसांनी जोरदार कारवाई करत तब्बल ३ कोटी ३१ लाख ३० हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​पहिल्या आठवड्यात विविध कलमांन्वये एकूण २२२ कारवाया करण्यात आल्या असून ३३५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात गुटखाविरोधी ३ कारवायांमध्ये ४.४७ लाख रुपयांचा मुद्देमाल, मटका-जुगाराच्या ४० कारवायांत १७.३० लाखांची रोकड व साहित्य, दारूबंदी कायद्याखाली १३७ कारवायांत ८.४५ लाखांचा मुद्देमाल, तर शस्त्र अधिनियमान्वये ६ प्रकरणांत ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर ३६ गुन्ह्यांमध्ये ३ कोटींहून अधिकचा साठा जप्त केला आहे.

Crime News
Beed Navratri Festival 2026 : खासबाग देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाची तयारी

जिल्हानिहाय कामगिरीत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त झाला. तर नांदेड जिल्ह्यात १.१० कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे गुटखाविरोधी, नांदेडातील उस्माननगर येथे जुगारविरोधी आणि लातूरमधील अहमदपूर येथे मटक्याविरुद्ध धाडी टाकून मोठी कारवाई केली.

Crime News
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करा

​'खबर' हेल्पलाइनचे आवाहन

परिक्षेत्रातील नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती थेट पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवता यावी, यासाठी ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी निर्भीडपणे अवैध व्यवसायांची माहिती या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news