नांदेड, पुढारी वृत्तसेवा: पावसाने दि. २५ सप्टेंबर रोजी ९५ टकूयांचा उंजरठा ओलांडला, त्यामुळे आता सप्टेबर अबेर वार्षिक पर्जन्यमान सरासरी ओलांडल, अशी शक्यता होती. परंतु ती फोल ठरली असून मागील तीन दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. उलट में मंहिन्यासारखे रणरणते ऊन पोळते आहे आणि उकाड्याने नांदेडकर हैराण झाले आहेत.
भाद्रपद महिन्याचे अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. दि. २६ रोजी सूयनि हस्त नक्षत्रात प्रवेश केला. वार्षिक पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत ९५ की सीमा ओलांडली होती. यावर्षी हवामान खात्याचा अंदाज बरोबर उरतो, त्यामुळे २५ आणि २६, सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला. परिणामी तो ९५.९२ टक्क्यांबर पोहोचला. आता तो केव्हातरी संभरी पार करेल असे दावे केले जात असतानाच पाऊस फक्त आपण परत येणार, एवढीच गर्जना करतो आहे.
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळपर्यंत असे तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली, रविवारी वार्षिक सरासरीच्या १७.९६ गा 'माईल स्टोन'वर तो उभा होता. नेहमीप्रमाणे रविवारीही दुपारनंतर बातावरणात बदल झाला. आकाशात उगांची जमवाजमव सुरु होती. पण मागील दोन दिवसातही असाच बदल झाला होता परंतु त्याचे रुपांतर काही पावसात झाले नाही. हवामान खात्यानेही ताजा कोणताही अंदाज वर्तवला नाही. त्यामुळे 'नष्टंरा नाईनटी' मध्ये अडकलेल्या पावसाची केव्हा सुटका होते आणि तो केव्हा केव्हा सरासरीच्या सीमारेषे पार जातो, याचाबत नांदेडकरांमध्ये आतुरता आहे.
बऱ्याच वर्षांपासून ऐन गणेशोत्सवात जोरदार पावसाची परंपरा सुरु झाली आहे. किंबहुना खच्या अधनि पाऊस पाच दहा दिवसात आपल्या टार्गेटकडे वेगाने प्रवास करतो. परंतु यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले. संपूर्ण गणेशोत्सवात थेंबही पडला नाही. परंतु त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. उत्तरा नक्षत्रात नियमितपणे पाऊस पडला आणि शंभरीध्या उंबरठ्चावर येऊन चचकला. आता येत्या गुरुवारपासून (दि. तीन) घटस्थापना होत आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवात पाऊस अनुशेष भरुन काढतो की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.