Nanded Political News : मध्यरात्रीच्या राजकारणातला 'हसरा चमत्कार'

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणु‌कीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय केला.
Nanded Political News
Nanded Political News : मध्यरात्रीच्या राजकारणातला 'हसरा चमत्कार'File Photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणु‌कीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय केला. या काळात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी आयटीएम परिसरात दिसून आली. तेथील 'आँखो देखा हाल' पक्षाच्या एका कार्यकत्यनि नोंद केला. त्याचा हा वृत्तांत.

Nanded Political News
चिखलीकर परिवारासोबत आयुष्यभर राहणार

वेळ होती मध्यरात्रीची...

भाजप कार्यालयासमोर इच्छुकांची अक्षरशः जत्राच भरलेली. कुणाच्या चेहऱ्यावर आशा, कुणाच्या नजरेत शंका, तर कुणाच्या आवाजात थेट बंडखोरी! प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न "माझ्या तिकिटाचं काय?"

आणि शेजाऱ्याच्या चेहऱ्याकडे संशयाने पाहणारी नवर।

याच गर्दीत एक निष्ठावंत कार्यकर्ता, माजी नगरसेवक प्रतिनिधी, अचानक भावनिक उद्रेकात जोरजोराने ओरडू लागला.

Nanded Political News
Nanded News : नांदेडला भाजपचे बी. फॉर्म चव्हाणांकडे

"आम्ही बीसवीस वर्ष पक्षाचं इमानेइतबारे काम करतोय, दोनदा निवडून आलो. तरीही आम्हाला तिकीट नाही। आणि पक्षाचे सदस्य नसलेल्यांना, काल-परवाच आलेल्यांना, दोन नंबरवाल्यांना तिकीट देता?"

क्षणार्धात सगळ्यांचे लक्ष त्या दिशेने विधले गेले. वातावरण तापले. जुन्या कार्यकर्त्यांना वाटले बरे झाले, कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधली।

काहींना वाटले, आज तरी मोठा स्फोट होणार। काहींनी मान खाली घातली, तर काहींनी मोबाईल कैमेरे ऑन करण्याची तयारी केली.

पण अशोकरावांची करडी नजर सगळीकडे फिरताच मोबाईल पुन्हा खिशात दडून बसले. तेवढ्यात साहेबांनी अत्यंत शांतपणे त्या निष्ठावंताला एकट्यात आत बोलावले.

मनपा निवडणूक रणसंग्राम

दरवाजा बंद झाला

बाहेर सगळे श्वास रोखून वाट पाहू लागले. नेमकं आत काय घडलं?

समजावणूक झाली? की राजकारणातला तो गृह "समजुतीचा फॉम्र्युला" वापरला?

एक मिनिट दोन मिनिट

आणि अवघ्या तीन मिनिटांत दरवाजा उघडला।

तोच कार्यकर्ता जो थोड्याच वेळापूर्वी आग ओकत होता आता हसऱ्या चेहऱ्याने, प्रसन्न मुद्रेने, मान हलवत बाहेर आला.

ज्वालामुखीसारखा उसळणारा निष्ठावंत अचानक कोजागिरीच्या चंद्रासारखा शांत भासत

होता!

राग, संताप, अन्याय सगळं कुठे गायब इवले, कुणालाच कळलं नाही.

गर्दीत कुजबुज सुरू झाली.

"काय बोलले साहेबांनी?"

"समजावले?"

"की तो प्रसिद्ध 'जादुई डोस' दिला?" उत्तर मात्र कुणालाच मिळाले नाही.

कुणी हसत म्हणाले,

"राजकारणात भाषणापेक्षा एकांतातली दीन मिनिटं जास्त प्रभावी असतात!"

तर कुष्णों टोमणा मारला, "हेच ते मध्यरात्रीचे राजकीय चमत्कार।"

एक मात्र नक्की

राजकारणात रागाला दोन मिनिटांत हाल्यात बदलण्याची कला अजूनही माजी मुख्यमंत्री यांच्या कडे शाबूत आहे

आणि म्हणूनच, मध्यरात्रीही कार्यालयासमोर गर्दी जमते।

त्या रात्री तिकीट कुणाला मिळालं, यापेक्षा रागातून हास्यापर्यंतचा हा प्रवास सगळ्यांच्या लक्षात राहिला।

व्हीआयपी रोडवरील एका संस्थेच्या कार्यालयासमोरील गर्दी ओसरायचे नाव घेत नव्हती. याच गर्दीत "साहेच कधी एकट्यात मेटतात?" याची आतुरतेने वाट पाहणारा एक माजी विरोधी पक्षनेता अखेर संधी साधत अशोकराव बाहेर निघताना त्यांना गाठण्यात यशस्वी झाला.

नांदेड दक्षिण विधानसभेतील त्याच्या प्रभागात मुस्लिमांची टक्केवारी वाढल्याने त्याचे विजयाचे गणित बिघडले होते, त्यामुळे कित्येक दिवसांपासून "बेट नांदेड उत्तरमध्ये घुसखोरी" करण्याचा प्रयत्न सुरू होता.

मात्र भाजपच्या संभाव्य यादीत नाव नसल्याची लक्षणे दिसताच, "मी कसा निवडून येती" याचा सविस्तर, आकडेमोडीचा व अनुभवसिद्ध आराखडा साहेबांच्या कानावर घालण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला.

पण राजकारण

अशोकरावांच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य ना उत्सुकता ना होकार पूर्ण राजकीय निर्विकारता !

अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, "महादेवाला प्रसन करायचे असेल तर आधी नंदीला साकडे मालावे" या तत्यानुसार त्यांनी थेट महानगराध्यक्षांकडे धाव घेतली.

मात्र यावेळीही महादेवाचा कल ओळखून 'अमरकहानी'ने कोणताही चमत्कार दाखविला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्या नेत्यांकडे सकाळ संध्याकाळ पाणी मारत असलेला हा कार्यकर्ता अखेर रिकाम्या हंड्यासह बाहेर पडला. अपेक्षा, आशा आणि गणिते सगळीच फसली, निराशेने उतरलेला त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. आणि गर्दीत उभे असलेले कार्यकर्ते मनातल्या मनात एकच म्हणत होते कोळून-पिलेल्या "मध्यरात्री सगळे चमत्कार घडत नाहीत. काही फक्त शेखचिल्लीच्या स्वप्नातच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news