

संजीव कुळकर्णी
नांदेड : उमरी तालुक्यातील गोरटेकर बंधू आणि त्यांच्या गटाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पावन करून घेण्याचे निश्चित झाल्यानंतर या बंबूंच्या सततच्या पक्षांतरामध्ये केंद्रस्थानी असलेली उमरी जीनिंग-प्रेसिंग आणि या संस्थेच्या जमीन विक्रीचे प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून त्यावर गंडांतर आणण्याचे काम आत्ता भाजपा नेत्यांना करावे लागणार आहे.
उमरी जीनिंग प्रेसिंग संस्थेच्या जमीन विक्री प्रकरणातील अनेक घडामोडी मागील काही वर्षात पुढारी ने वेळावेळी जनतेसमोर आणल्या, मागील काळातील बातम्यांचे अवलोकन केले असता, आपले हे प्रकरण मार्गी लागावे, याकरिता गोरठेकर परिवाराने २०१९ ते २०२४ या कालखंडात वेळोवेळी पक्षांतरे केली; पण यांचा मुख्य हेतु पूर्णतः साध्य झालेला नाही. तो उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मार्गी लागेल, असे गृहीत धरून त्यांनी नवे राजकीय पाऊस उचलले आहे.
अशोक चव्हाण काँग्रेस पक्षामध्ये असताना बापूसाहेब गोरठेकर यांना २०१९मध्ये भाजपात घेऊन त्यांना भोकरमधून विधानसभेसाठी उभे करण्यात आले. त्यावेळी भाजपा नेत्यांनी जीनिंग जमीन विक्री प्रकरणात गोरठेकरांना मदत केली हे खरे; पण तेव्हा विक्री प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता बापूसाहेबांच्या पश्चात त्यांची मुले कारभारी झाले असून सहकार खाते 'राष्ट्रवादी'कडे असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या मुख्य इराद्यावर म्हणजे जमीन विक्रीच्या प्रकरणावर भाजपाला घाव घालावा लागणार असून तशा हालचाली नदिइमधून सुरू झाल्या आहेत.
'राष्ट्रवादी' से आमदार प्र.गो. चिखलीकर यांनी ठिकठिकाणच्या अशोक चव्हाण विरोधकांची मोट बांधण्याची मोहीम हाती घेतली असून जिल्ह्यामध्ये त्यांनी भावयालाच आव्हान देण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे लाड थांबवावेत, अशी मागणी भाजपातील काहींनी आधीच केली होती. आता चिखलीकरांनी गोरटेकरांना आपल्या गळाला लावताना आपल्यात पक्षातील स्थानिक गटाचीही नाराजी ओढवून घेतली आहे. राजकीय पातळीवरील या खटाटोपात पक्षविस्तार हा एक भाग असला, तरी गोरठेकरांचे पांतर आणि नवा पक्षप्रवेश हा केवळ जमीन विक्री प्रकरण आणि त्यातील अर्थकारणाशी निगडित समजला जात आहे. तब्बल सात आठ वर्षांपासून हे प्रकरण सुरू असल्याचे दिसून येते.
वरील संस्थेचे अस्तित्व आज केवळ कागदोपत्री आणि जमिनीच्या स्वरूपातील मालमत्तेपर्यंत मर्यादित आहे. (कै.) बाबासाहेब गोरठेकरांच्या प्रभावशाली काळात उमरी जीनिंग परिसरातील प्रेसिंग चा प्रकल्प मराठवाड्यात सर्वात मोठा समजला जात होता. मागील अनेक वर्षांपासून तेथे कोणतीही प्रक्रिया नाही, व्यवहार होत नाहीत. कामकाज ठप्प झालेले; पण या जीनिंग-प्रेसिंगचे आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली १५ व इतर साहित्याची विल्हेवाट लावण्यात विरोध करणाऱ्या जाणत्यांचे म्हणणे आहे.
मागील काळातील वेगवेगळ्या घडामोडी पाहता उमरी जीनिंग-प्रेसिंगचे प्रकरण जिल्हा उप निबंधक कार्यालयापासून सहकार न्यायालयापर्यंत, कधी मंत्रालयात तर कधी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या मुद्यांवर दाखल झाले. आता या प्रकरणाचा निवाडा लातूर येथील विभागीय उप निबंधक यांच्या कक्षेमध्ये गेला असल्याचे दिसून आले. ते या प्रकरणात काय भूमिका येतात, याकडे भाजपाचे प्रमुख नेते लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले