गॅस सिलिंडरच्या गर्दीत दर्दी कमी !

बंदोबस्त देणार : कार्ड बंद पडलेले, ई-केवायसी न झालेल्यांची संख्या अधिक
nanded gas distributors news
गॅस सिलिंडरच्या गर्दीत दर्दी कमी !file photo
Published on
Updated on

Nanded Police protection will be provided to gas distributors

नांदेड, पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात गॅस सिलिंडरसाठी लोक चिंताग्रस्त होऊन एजन्सीच्या बाहेर भर उन्हात गर्दी करून होते; परंतु यात खरे गरजवंत कमी आणि ज्यांच्या जोडण्या रद्द झाल्या, ज्यांची इ-केवायसी झालेली नाही किंवा स्थलांतरित लोकांची संख्या जास्त असल्याचे बुधवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत समोर आले. दरम्यान, हातघाईची परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक एजन्सीवर पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

nanded gas distributors news
Waluj Mahanagar : अवैध धंद्यांविरोधात गावबंद आंदोलन

इराण आणि अमेरिका, इस्रायल युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ आणि गॅसच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला. त्यात बातम्यांमुळे लोकांमध्ये खळबळ माजली. ऐनवेळी परेशानी नको या भावनेतून लोकांनी एजन्सीबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. शिवाय ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सुद्धा धावपळ सुरू झाली. परिणामी यंत्रणेवरील ताण सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढला. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी होत नव्हती आणि एजन्सीबाहेर जमलेल्या लोकांना एजन्सीचे कर्मचारी आरेरावीने बोलत असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.

उपरोक्त पार्श्वभूमीवर बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या उपस्थितीत एजन्सीध- ारकांची बैठक झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बारदेवाड यांनी एजन्सीधारक व तिन्ही कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांना सूचना दिल्या. एजन्सी धारकांनी ज्या तक्रारी मांडल्या. त्यानुसार गर्दीमध्ये खरे गरजवंत कमी होते. ज्यांच्या नावे अद्याप जोडणी झालेली नाही, कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे नामबदल झालेला नाही, इ-केवायसी झालेली नाही, अशा नागरिकांची संख्या अधिक असल्याने परिस्थिती गंभीर बनली.

nanded gas distributors news
Manvat Municipal Council | मानवत नगरपरिषदेत ऐतिहासिक ठराव मंजूर: जाचक मालमत्ता करास अखेर स्थगिती

आपल्याला सिलिंडर मिळणार नाही, या चिंतेने लोकांनी धावपळ सुरू केली. उन्हाचा पारा तापलेला असताना सुद्धा लोक रस्त्यावर उभे होते. परिणामी प्रशासनावरील ताण वाढला. काही ठिकाणी सहनशीलता संपलेल्या नागरिकांनी आततायी भाषा सुरू केली.

दरम्यान, मागील आठवड्यापेक्षा परिस्थिती अर्धाअधिक आटोक्यात आली असून लोकांतील अस्वस्थता संपते आहे. ग्रामीण भागात मात्र अजूनही लोकांमध्ये चिंता आहे. दरम्यान, विनंतीनुसार एजन्सीसमोर एका आठवड्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचे मान्य करण्यात आले. एजन्सीधारकांच्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news