Nanded gutkha seizure : अर्धापूर पोलिसांकडून कारसह सव्‍वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने पार्टी शिवारातील उड्डाणपुलाजवळ सापळा रचून कारवाई केली.
Nanded gutkha seizure
अर्धापूर पोलिसांकडून कारसह सव्‍वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्तpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने पार्टी शिवारातील उड्डाणपुलाजवळ सापळा रचून कारवाई करत एका अर्टिगा कारसह तब्बल ८ लाख १७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी अर्धापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव मांजरमकर यांना गुटख्याच्या बेकायदेशीर वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पार्टी शिवारातील उड्डाणपुलाजवळ टोलनाक्याच्या अलीकडे गस्त वाढवली.

Nanded gutkha seizure
Breakfast and weight loss : वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळताय? आधी हे नक्की वाचा

दरम्यान, एक संशयित मारुती सुझुकी अर्टिगा कार (क्रमांक MH-14-EC-4677) येताना दिसली. पोलिसांनी पंचांसमक्ष गाडी थांबवून तपासणी केली असता, चालकाने आपले नाव सय्यद मुक्तार सय्यद रसूल (वय ३४, रा. कानडखेड, ता. पूर्णा, जि. परभणी) असे सांगितले.

​वाहनाची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला विमल पानमसाला आणि प्रिमियम व्ही-१ जर्दा असा एकूण ३ लाख १७ हजार २४० रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळला. पोलिसांनी गुटख्यासह ५ लाख रुपये किमतीची अर्टिगा कार असा एकूण ८ लाख १७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Nanded gutkha seizure
Jalna Municipal Corporation grant : जालना महापालिकेला ६.०२ कोटींचे जीएसटी अनुदान

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा बंदीत माल कोठून आणला, याचा पुरवठादार कोण होता आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता, याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, सपोनि भास्कर कांबळे, पोउपनि भोसले, अंमलदार गजानन शिंदे व गौतम कांबळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news