illegal sand mining : नांदेडमध्ये वाळूमाफियांवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

माळकौठा, कौडगाव येथून 2 कोटी 84
illegal sand mining
नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी वाळूमाफियांवर कारवाई केली. pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर पोलिस प्रशासनाने गुरुवारी (12 मार्च) दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठा दणका दिला आहे. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकांनी माळकौठा व कौडगाव केलेल्या या दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल 2 कोटी 84 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे.

गेल्या कांही दिवसांपासून वाळूमाफियांच्या विरोधात पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौडगाव (ता. कंधार) शिवारात छापा टाकला. यावेळी नदीपात्रातून इंजिन बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीने पथकाने कारवाई केली.

illegal sand mining
Nanded civic politics : सीलबंद पाकिटात स्वीकृत सदस्यांची नावे सादर

या कारवाईत वाळू उपसा करणाऱ्या बोटी जागीच नष्ट करण्यात आल्या असून, 9 आरोपींविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वाळू शेजारील जिल्ह्यांमध्येही पुरवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. वाळू माफियांनी डोके वर काढल्याने ही धडक कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांच्या पथकाने वाळू माफियांना दिला आहे.

माळकौठा येथे एसपींच्या पथकाची कारवाई

मुखेड तालुक्यातील माळकौठा येथील गोदावरी नदीपात्रात पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली. या मोहिमेत वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे 80 लाख रुपयांचे साहित्य जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कारवाईचा गोषवारा

विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने कौडगाव शिवार 2 कोटी 4 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला व 9 जणांवर गुन्हा दाखल केला तर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने माळकौठा ( ता. मुदखेड) येथे कारवाई करत 80 लाख रुपये साहित्य जप्त करून नष्ट केले तसेच 4 जणांवर गुन्हा वर दाखल केला. दोन कारवाईत एकूण 2 कोटी 84 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

illegal sand mining
Inspirational story : वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी युवराजची जिद्द

जप्त केलेला मुद्देमाल

  • 5 हायवा आणि 1 टिप्पर

  • 2 पोकलेन मशीन

  • 1 इंजिन बोट , 1 फायबर बोट

  • 55 ब्रास वाळू

  • एकूण किंमत : 2 कोटी 4 लाख 75 हजार रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news