Inspirational story : वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी युवराजची जिद्द

गेवराई ः दशक्रियाविधी दिवशी दिला दहावीचा पेपर
Georai student emotional exam story
वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी युवराजची जिद्दpudhari photo
Published on
Updated on

गजानन चौकटे

गेवराई ः आयुष्यातील सर्वात मोठे दुःख उराशी घेऊनही शिक्षणाची वाट न सोडणाऱ्या एका मुलाची जिद्द सध्या संपूर्ण गेवराई तालुक्याला भावुक करून गेली आहे. वडिलांच्या निधनानंतर दशक्रिया विधीचा दिवस असतानाही युवराज पाचपुते या दहावीच्या विद्यार्थ्याने डोळ्यांतील अश्रू पुसत प्रथम आपला विज्ञान भाग-2 चा पेपर दिला आणि पेपर संपल्यानंतरच जड अंतःकरणाने वडिलांच्या दशक्रिया विधीत सहभागी होत पित्याला अंतिम निरोप दिला.

युवराजचे वडील संतोष पाचपुते (वय 41) यांचा धूलिवंदनाच्या रात्री शहरात दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने पाचपुते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Georai student emotional exam story
Swarati hospital redevelopment : अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचा होणार कायापालट

घरात आक्रोश, नातेवाईकांची गर्दी आणि वडिलांच्या आठवणींनी भरलेले वातावरण अशा अवस्थेत युवराजसमोर आयुष्याची कठीण परीक्षा उभी राहिली होती. मात्र वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व त्याच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यामुळे दुःखाचा डोंगर उराशी ठेवत त्याने बुधवारी हिंदीचा पेपर दिला आणि सायंकाळी पित्याला मुखाग्नी दिला.

Georai student emotional exam story
Beed gas stock update : बीड जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका

दरम्यान, शुक्रवार (दि. 13 मार्च) रोजी वडिलांचा दशक्रिया विधी होता. पण त्याच दिवशी दहावीचा विज्ञान भाग-2 चा पेपर असल्याने युवराजने पुन्हा एकदा धैर्य दाखवले. सकाळी 11 ते 1 या वेळेत त्याने पेपर दिला. पेपर संपताच तो थेट विधीकडे गेला आणि जड अंतःकरणाने वडिलांच्या दशक्रिया विधीत सहभागी झाला.

  • एका बाजूला वडिलांच्या जाण्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला आयुष्य घडवणारी परीक्षा या दोन्ही प्रसंगांना धैर्याने सामोरे गेलेल्या युवराजची जिद्द पाहून गेवराई तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, या एका निर्धाराने युवराजने दाखवलेली ही जिद्द प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news