Nanded News | युवकाच्या खून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, १० ऑक्टोबर २०२३ रोजी घडला होता गुन्हा
Court
CourtPudhari
Published on
Updated on

मुखेड :- तालुक्यातील एका युवकाच्या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तर एका महिला आरोपीस एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी रमेश गोविंद राठोड (रा. आंदेगाववाडी, भोज तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्याद दिली होती. त्या दिवशी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा विनोद राठोड हा बाजेवर बसला असताना चारही आरोपी ओरडत आले. यात पिंटू उर्फ अंकुश बळीराम राठोड याने विनोदच्या अंगावर मिरची पूड फेकली, काशीबाई धोंडिबा राठोड हिने त्याचे हात पकडून धरले, तर धोंडिबा देवला राठोड याने चाकूने छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या विनोद राठोड याला तातडीने देगलूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Court
Nanded News : जीवन घोगरेंच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २०४/२०२३ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२, ३२३, ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात सुनावणीदरम्यान एकूण १५ साक्षीदारांची साक्ष व युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी दि. १३ मार्च २०२६ रोजी निकाल दिला. त्यामध्ये आरोपी धोंडिबा देवला राठोड, पिंटू उर्फ अंकुश बळीराम राठोड, काशीबाई धोंडिबा राठोड यांना भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच आरोपी क्र. ४ कल्पना उर्फ शामा धोंडिबा राठोड हिला भा.दं.वि. कलम ३२४ व ५०४ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरोपी कल्पना राठोड यांची कलम ३०२ मधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Court
Nanded ITI new hostel : नांदेड आयटीआयसाठी 300 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वसतिगृह मंजूर

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. तसेच पोलीस कर्मचारी राज वाघमारे यांनी तपास व न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news