Nanded News : पंढरपुरात पांडुरंगाच्या पूजेचा मान उंचेगावच्या शिंदे दाम्पत्याला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासमवेत आरती व पूजेचा सन्मान
Nanded News
Nanded News : पंढरपुरात पांडुरंगाच्या पूजेचा मान उंचेगावच्या शिंदे दाम्पत्यालाfile photo
Published on: 
Updated on: 

Nanded News: Shinde couple from Unchegaon gets the honor of performing the worship of Panduranga in Pandharpur

निवघा बाजार, पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर हदगाव तालुक्यातील उंचेगाव (खु.) येथील सुधाकर शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. प्रणिता शिंदे या दाम्पत्याला प्रथमच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाच्या आरती व पूजेचा मान मिळाला.

Nanded News
Nanded rajgad nagar tragedy| मुलीने जीवन संपवल्यानंतर आईचाही विषप्राशनाचा प्रयत्न; राजगड नगर हादरले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासमवेत हा धार्मिक सन्मान मिळाल्याने उंचेगावसह हदगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिंदे कुटुंबाची परंपरा पूर्वापार वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे. सुरुवातीला सुधाकर शिंदे यांचे वडील नियमित वारी करत असत.

Nanded News
Nanded News : एकीकडे पाणीकपातीचा घाट; दुसरीकडे बांधकामांवर मात्र पाण्याचा मारा भरमसाठ

"पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळेल, अशी अपेक्षा कधीच नव्हती. हा योग अनपेक्षितपणे जुळून आल्याने पूर्वजन्मी काही पुण्य केले असावे, अशी भावना मनात निर्माण झाली. हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा व भाग्याचा क्षण आहे," असे सुधाकर शिंदे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. या पूजेच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून व नातवंडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.