Nanded News : पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

यावेळी जनावरांसाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसेच विद्युत मोटारींच्या वीजपुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली.
Nanded News
Nanded News : पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधला ग्रामस्थांशी संवादfile photo
Published on: 
Updated on: 

Nanded News : Officials of animal husbandry department interacted with villagers

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लोहा तालुक्यातील आंडगा (दक्षिण) येथे संयुक्त क्षेत्रीय भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

Nanded News
Nanded News: सख्ख्या भावानेच मारला घरात डल्ला; ४२ हजारांची चांदीची भांडी लंपास

आंडगा (दक्षिण) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मन्याड (लिंबोटी) धरणावरील विद्युत मोटारींचा वीजपुरवठा दररोज दोन ते तीन तास सुरू ठेवून जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Nanded News
Nanded News : नांदेड जिल्ह्यात अवैध सावकारी अन् जबरी कर्जवसुलीविरुद्ध विशेष मोहीम

यावेळी जनावरांसाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसेच विद्युत मोटारींच्या वीजपुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली. परिसरात उपलब्ध असलेल्या वाळलेल्या चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत तसेच पशुधनासाठी संतुलित आहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.