Nanded News : सहलीवरच्या नगरसेवकांची नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली !

खा. अशोक चव्हाणांकडून भाजपाच्या विजयाचा दावा
Nanded News : सहलीवरच्या नगरसेवकांची नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली !
Published on
Updated on

Nanded News: Netizens mock corporators on a trip!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीतील बहुसंख्य मतदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना भाजपाच्या स्थानिक नियोजनकारांनी सहलीवर पाठविल्याची बाब सार्वत्रिक झाल्यानंतर या प्रकाराची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडविण्यात आली आहे. पण त्याची कुठल्याही पातळीवर नोंद न घेता भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचा दावा येथे केला.

Nanded News : सहलीवरच्या नगरसेवकांची नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली !
Nanded municipal politics : कारवाईच्या भीतीपोटी न्यायालयीन प्रक्रियेतून काँग्रेसचा घुमजाव!

गेल्या काही महिन्यातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे सर्वोच्च नेते, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल व इतर इंधनांच्या वापरात काटकसर करण्याचे आवाहन केले; पण नांदेड जिल्ह्यात त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या आवाहनास हरताळ फासत तीनशे नगरसेवक व काही सोबत्यांना खाजगी वाहनांतून सहलीवर पाठविले.

कोणी गोव्यात, कोणी कोकणात तर कोणी अज्ञातवासात अशी परिस्थिती दिसून आली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुदखेड गावामधून 'प्रभागात नगरसेवक दाखवा; हजार रूपये मिळवा' असा खोचक संदेश समाजमाध्यमांत फिरत आहे.

बहुसंख्य नगरसेवकांना सहलीपूर्वी देण्यात आलेली अनामत रक्कम वेगवेगळ्या माध्यमांतून उघड झाली. त्या रकमेचा उल्लेख करत घरदार, लेकरंबाळं आणि प्रभागास वाऱ्यावर सोडून सहलीला गेलेल्या नगरसेवकांचा एका संदेशात निषेध नोंदविण्यात आल्याचे दिसून आले.

Nanded News : सहलीवरच्या नगरसेवकांची नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली !
शंकररावांच्या घरावर भाजपाचा झेंडा फडकला!

जिल्ह्यातील नगरसेवकांत ५० टक्के महिला आहेत; पण बहुतांश नगरसेविकांचे पतीराज सहलीमध्ये सामील झाल्याचे एका संदेशातून समोर आले. नांदेड शहरातील काही सुसंस्कारित पुरुष-महिला नगरसेवक वगळता बहुसंख्य नगरसेवकांनी भाजपाच्या 'चला सहलीला' या अभियानाचा लाभ घेतला असून सहलीला गेलेल्या सर्व नगरसेवकांना १६ तारखेच्या रात्री लातूर येथे एकत्र जमवले जाणार आहे.

कंधार, हिमायतनगर व काही नगर परिषदांतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवकही भाजपा पुरस्कृत सहलीमध्ये सामील झाल्याचे त्या-त्या भागांतून येणाऱ्या माहितीतून समोर आले. काँग्रेस खासदारांच्या नायगाव गावात बहुसंख्य नगरसेवक काँग्रेसचेच आहेत. त्यांच्या बाबतीतील माहिती समोर आली नाही; पण काँग्रेस नगरसेवकांच्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू असताना या पक्षाचे खासदार किंवा एकाही जबाबदार नेत्याने पक्षाची भूमिका आतापर्यंत स्पष्ट केली नाही.

देगलूर नगर परिषदेत काँग्रेसच्या निर्वाचित व स्वीकृत नगरसेवकांची संख्या १३ असून हे सर्व नगरसेवक महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासोबत आहेत, असे काँग्रेसचे स्थानिक नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले.

भोकर, उमरी आदी नगर परिषदांचे नगरसेवक सोलापूर-कोल्हापूर मार्गे गोव्यामध्ये गेले. भोकरच्या आजी-माजी नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी कोल्हापूरातील महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील एक समूह छायाचित्र समाजमाध्यमांत जारी केले. त्यावर आजी-माजी नगराध्यक्षांना 'लक्ष्मीदर्शन' अशी टिप्पणी करण्यात आली. बहुसंख्य नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आल्याची बाब भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी उघडपणे मान्य केली आहे. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी नांदेडमधील राजकारणातल्या अर्थकारणावर अत्यंत टोकदार टीका केली; पण त्यांची ही टीका विरोधकांच्या बाबतीत असावी, अशी सारवासारव भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली. त्याचवेळी भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news