Nanded News : १६ मार्चला मनपा स्थायी समिती अन् महिला-बालकल्याण समिती होणार गठित !

सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे १६, तर महिला बालकल्याण समितीचे ११ सदस्य निवडणार
Nanded Political News
Nanded News : १६ मार्चला मनपा स्थायी समिती अन् महिला-बालकल्याण समिती होणार गठित ! File Photo
Published on
Updated on

Nanded News: Municipal Corporation Standing Committee and Women and Child Welfare Committee to be formed on March 16!

रमेश पांडे

नांदेड: नदिड-वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा येत्या १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती गठीत केली जाणार आहे. स्थायी समितीच्या १६ आणि महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांची निवड करण्याचा प्रस्ताव आहे.

Nanded Political News
Nanded News : महामार्गावरील 'ते' प्रकरण भोवले!

१० फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया होऊन एक महिन्याचा कालावधी उलटल आहे. नूतन महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेची अधिकृत सूचना नगरसचिव स. अजीतपालसिंघ संधू यांनी ६ मार्च रोजी जारी केली.

या सभेत स्थायी समितीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतील कलम ३० (अ) नुसार महिला व बालकल्याण समितीतील सदस्यांपैकी किमान ७५ टक्के सदस्य महिला असणे अनिवार्य आहे. त्यामुळे या समितीवर ११ पैकी किमान ८ महिला सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.

Nanded Political News
Nanded News : 'वॉटर ग्रीड'चे काम संथगतीने

नामनिर्देशनाद्वारे १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. मान्यताप्राप्त पक्ष अथवा नोंदणीकृत पक्ष तसेच गटाचे एकूण संख्याबळ विचारात घेऊन ही निजड करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ८१ सदस्यीय नांदेड मनपात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे एकूण ४९ सदस्य संख्या असल्यामुळे स्थायी समितीवर भाजपा महायुतीचे १० सदस्य निवडले जातील.

१५ नगरसेवक वाजपेयींच्या स्मारकाचाही प्रस्ताव माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व व कार्याची माहिती नांदेडकरांना व्हावी या उद्देशाने नांदेड शहरात त्यांचा पुतळा उभारणीला मंजुरी व त्यासाठी आवश्यक निधी आणि जागा संपादनाची प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी देण्याचा प्रस्तावही या सर्वसाधारणसभेत सादर होणार आहे.

असलेल्या कब्रिस आणि अंचितला ३ आणि १४ नगरसेवक असलेल्या एमआयएमच्या ३ सदस्यांना स्थायी समितीवर संधी मिळणार आहे. स्थायी समितीप्रमाणेच महिला व बालकल्याण समितीवरही ११ सदस्यांची नामनिर्देशनद्वारे निवड केली जाणार आहे. संख्याबळ आणि तौलनिक बळाच्या आधारे ही निवड केली जाणार असल्यामुळे भाजपा-शिवसेना महायुतीला या समितीवर ७ सदस्य पाठत्रता येणार आहेत, तर काँग्रेस-पंचित आणि एमआयएमच्या प्रत्येकी २ सदस्यांना संधी मिळणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे केवळ दोन सदस्य आणि एक अपक्ष आहे. त्यांना या दोन्ही समितीवर संधी मिळणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news