Nanded Public welfare schemes | मुखेड तालुका मानव विकास योजनेपासून वंचित

प्रवासादरम्यानचा मनस्ताप आणि वाढत्या तिकीट दरामुळे होणारी आर्थिक अडचण लक्षात घेवुन ही योजना राबवली जावी; पालकांची मागणी
Nanded Public welfare schemes | मुखेड तालुका मानव विकास योजनेपासून वंचित
Published on
Updated on

मुखेड : जिल्ह्यात मानव विकास मिशन योजनेअंतर्गत 9 तालुक्यात ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातुन शैक्षणिक व अरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

वास्तविक मुखेड तालुका डोंगराळ भाग असल्याने या भागातील मुलींना शिक्षणासाठी मानव विकासची बससेवा व सायकलची अवश्यकता असताना हा तालुका वगळण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलींना शैक्षणिक सोयी मिळवुन देण्यासाठी हा तालुका मानव विकास मिशन योजनेत समाविष्ठ करावा; अशी मागणी जि.प. मुलींचे हायस्कुल मुखेडचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय यलमवाड यांनी केली आहे.

Nanded Public welfare schemes | मुखेड तालुका मानव विकास योजनेपासून वंचित
SSY योजना : मुलगी म्हणेल, "थँक्यू बाबा! आज हे खाते उघडा... २१ वर्षांची होताच मिळतील तब्बल ७२ लाख रुपये"

मुखेड शहरात मुलींच्या हायस्कुलमध्ये जवळपास 1600 मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त मुली ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येत असतात. या व्यतिरीक्त शहरातील पाच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा व तीन नर्सिंग महाविद्यालय असून, प्राथमिक शाळाची संख्या व तेथे शिक्षण घेणाऱ्या मुलीना शिक्षणासाठी ये जा करण्यासाठी बस व अँटोचा अधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मुखेड परिसरातुन जवळपास 2000 हजारांच्यावर मुली शालेय शिक्षणासाठी येत असतात. मुखेड शहरा लगतच्या 5 कि.मी. अंतरावरील मुलींची संख्या लक्षात घेता त्यांना या योजनेच्या माध्यमातुन सायकलीचे वाटप करण्यात यावे व ग्रामीण भागातील मुलीना सुरक्षीत शालेय शिक्षणाचा लाभ मिळवुन देण्यासाठी मानव विकास बस सेवा सुरु करण्याची मागणी यलमवाड यांनी केली आहे.

Nanded Public welfare schemes | मुखेड तालुका मानव विकास योजनेपासून वंचित
Siddhivinayak Temple Income 2026: सिद्धिविनायक न्यासाचे उत्पन्न विक्रमी 182 कोटींवर! गतवर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढ

मुखेड शहरातील एकट्या मुलीच्या हायस्कुलमध्ये 1600 च्या वर मुलींची संख्या आहे. जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील शैक्षणिक संस्था व जि.प. शाळातील मुलीच्या संखेची वस्तीनिष्ठ माहीती मागवावी व मानव विकास योजनेच्या माध्यमातुन बससेवा व सायकल मिळवुन देण्यासाठी लक्ष घातल्यास या भागातील मुलींना सुरक्षित शिक्षणाची सोय होणार आहे. बसस्थानकावरील प्रवाशांच्या वाढत्यी गर्दीतुन शिक्षणासाठी येणा-या मुलींना मनस्ताप सहन करावा लागत असून, वाढत्या तिकीट दरामुळे होणारी आर्थिक अडचण लक्षात घेवुन ही योजना राबवली जावी अशी अपेक्षा असंख्य पालकानी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news