Nanded news | अवैध गोवंश कत्तलीच्या चर्चांना उधाण; चौकशीसह कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

आठवडी बाजारातील जनावरांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची मागणी; दुसरीकडे गोसेवेसाठी मठपती व सोमनाथ चिद्रावार यांचे योगदान चर्चेत
Beed cattle slaughter allegations
Beed cattle slaughter allegationsFile Photo
Published on
Updated on

नायगाव : तालुक्यातील नरसी, पिंपळगाव तसेच इतर काही ग्रामीण भागांत गोवंश कत्तलीचा अवैध व्यवसाय पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. यापूर्वी पोलिस आणि संबंधित विभागांनी केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, अलीकडील काळात काही ठिकाणी बंदीनंतरही गोमांस विक्री सुरू असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात गोवंश कत्तलीवर कायदेशीर निर्बंध असतानाही काही समाजकंटकांकडून रात्रीच्या वेळी गुप्तपणे हा व्यवसाय केला जात असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Beed cattle slaughter allegations
Gram Sabha Goa | अडीच कोटी निधी असूनही विकासकामे रखडली

विशेषतः नायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात थकलेली व अनुपयोगी जनावरे खरेदी करण्यासाठी काही दलाल सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशा जनावरांची खरेदी-विक्री करून त्याचा गैरवापर होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित यंत्रणांकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी सातत्यपूर्ण आणि ठोस कारवाईची अपेक्षा अद्याप कायम आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Beed cattle slaughter allegations
Goa - राज्यात प्रतिदिन सात रस्ते अपघात, रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

नागरिकांची प्रमुख मागणी

  • अवैध गोवंश कत्तलीच्या आरोपांची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी.

  • संशयित ठिकाणी संयुक्त तपासणी मोहीम राबवावी.

  • दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी.

  • अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष पथके नियुक्त करावीत.

  • आठवडी बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर प्रभावी देखरेख ठेवावी.

गोसेवेचे प्रेरणादायी उदाहरण

एकीकडे अवैध व्यवसायाच्या चर्चांनी वातावरण ढवळून निघत असताना, दुसरीकडे काही व्यक्ती गोसेवेतून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे चित्रही समोर येत आहे. वसंतनगर येथील बाला प्रसाद काशिनाथ मठपती तसेच खैरगाव येथील दालमिल व्यावसायिक सोमनाथ चिद्रावार यांनी स्वखर्चाने खाजगी गोशाळा उभारून सुमारे वीस ते पंचवीस गायींचे संगोपन सुरू ठेवले आहे. कसायांच्या तावडीत जाण्याची शक्यता असलेल्या गायी विकत घेऊन त्यांची सेवा करण्याचे कार्य बालाप्रसाद मठपती करत असल्याने त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. गोसंवर्धनासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही यानिमित्ताने व्यक्त केले जात आहे.

Beed cattle slaughter allegations
Patradevi Check Post | पत्रादेवी अत्याधुनिक तपासणी नाका ठरतोय डोकेदुखी

प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

या संदर्भातील सर्व आरोपांची निष्पक्ष पडताळणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करणे आणि कोणत्याही अफवांना आळा घालत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. अवैध कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याचा संदेश समाजात जाणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news