

हदगाव ः हदगाव पंचायत समिती व तहसील परिसरात काटेरी झुडपे व घाणीचे साम्राज्य अशा मथळ्याखाली दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित करताच आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर गटविकास अधिकारी डी.के.आडेराघो यांनी स्वतः उभे राहून कार्यालयाची झाडे, झुडपातून मुक्तता करवून घेतली.
या संदर्भात (दि.30) डिसेंबर रोजी दैनिक पुढारीने बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर तातडीने काटेरी झाडे झुडपे लगेच साफ करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे हदगाव पंचायत समितीचे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी डी.के.आडेराघो यांनी स्वतः पंचायत समिती परिसरात उभे राहून जेसीबीद्वारे पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेली काटेरी झाडेझुडपे, गवत कापण्यात आली असून यामुळे तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.