Nanded News : मनपातर्फे गोदावरी घाट स्वच्छता मोहीम यशस्वी

'स्वास्थ्यासाठी योग आणि पर्यावरणासाठी स्वच्छते'चा दिला संदेश
Nanded News
Nanded News : मनपातर्फे गोदावरी घाट स्वच्छता मोहीम यशस्वीfile photo
Published on
Updated on

Nanded News: Godavari Ghat cleanup drive by the Municipal Corporation successful

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने गोदावरी नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 'स्वास्थ्यासाठी योग आणि पर्यावरणासाठी स्वच्छता' हा संदेश देत महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. "गोदावरी नदी केवळ एका दिवसाच्या मोहिमेने स्वच्छ होणार नाही, तर तिला संपूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस सातत्याने काम करावे लागेल," असे प्रतिपादन *मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी यावेळी केले.

Nanded News
Purushottampuri yatra : पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रश्न ऐरणीवर!

सदर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ *महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी *जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोदावरी नदीच्या मुख्य घाटासह आसपासच्या परिसरातील कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्य आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर चकाचक करण्यात आला.

महापालिकेच्या स्वच्छता दूत आणि स्वच्छता विभागाच्या पथकाने आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने घाटाची स्वच्छता केली. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "योग आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्य देतो, तर स्वच्छता आपल्या परिसराला निरोगी ठेवते. गोदावरी नदी ही नांदेडची जीवनवाहिनी असून, तिच्या घाटांचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. केवळ आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता नागरिकांनी नदी पात्रात कचरा न टाकता हे स्वच्छता अभियान पुढेही सुरू ठेवावे."

Nanded News
Gangakhed sand excavation issue : वरून पाणी, खालून गोदावरी नदीची बिनधास्त चाळणी

या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश सुंकेवार, स्वच्छता विभागाचे उपायुक्त नितीन गाढवे, स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त मो. गुलाम सादेक, सर्व विभाग प्रमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक, सर्व स्वच्छता निरीक्षक, मनपा कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी आणि शेकडो नागरिकांनी श्रमदान केले.

गोळा केलेला सर्व कचरा महापालिकेच्या कचरा वाहतूक वाहनांद्वारे योग्य विल्हेवाटीसाठी डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्यात आला आहे. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर महापालिकेकडून यापुढे सातत्याने देखरेख व आवश्यक कारवाई केली जाईल तसेच गोदावरी नदीचे पाकिय राखण्यासाठी आणि शहर सुंदर बनवण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. महापालिकेच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल नदी घाट परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news