Ration card subsidy news | शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 40 लाख 35 हजार अनुदान वाटप

शिधापत्रिकेची कामे करून घेण्यास नागरीकांना मोठा भुर्दड सोसावा लागत आहे.
Ration card news
Ration card newsPudhari
Published on
Updated on

Nanded farmer ration card subsidy

मुखेड : तालुक्यातील शेतकरी शिधापत्रिकाधारक 2560 लाभार्थ्यांना 40 लाख 35 हजार अनुदान वाटप करण्यात आल्याची माहीती पुरवठा निरीक्षक एन.जी. रोहणकर यांनी दिली. शासनाने शेतक-याना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य मिळावे म्हणुन पांढ-या रंगाची शिधापत्रिका उपलब्ध करुन दिली.

Ration card news
Ahilyanagar Midday Meal Scheme Issues: अहिल्यानगरात पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह; 14 पैकी 12 तालुक्यांत अधीक्षक पदे रिक्त

काही कालावधीनंतर त्याना धान्याऐवजी ठराविक रक्कम देण्याचे जाहीर केले व धान्य पुरवठा बंद केला. पण सदर लाभार्थ्यांचे अनुदान निधी अभावी रखडले होते. 2025-26 मध्ये अनुदान प्राप्त झाल्यानंतर फेब्रुवारी 2026 पर्यंतचे 40 लाख35 हजार 2560 शेतक-याच्या खात्यावर थेट जमा करण्यात आल्याचे रोहणकर यांनी सांगीतले.

Ration card news
Ahilyanagar Midday Meal Scheme Issues: अहिल्यानगरात पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह; 14 पैकी 12 तालुक्यांत अधीक्षक पदे रिक्त

सार्वजनिक जीवनात शिधापत्रिका ही नागरीकासाठी शासकीय कामासाठी, रहीवाशी असल्याचा पुरावा म्हणून आवश्यक असल्याने शिधिपत्रिका काढणेसाठी नागरीक तहसिलअतंर्गत पुरवठा विभागाकडे अर्जबाजारीपणा केला, पण शिधापत्रिका मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे खेटा मारुन नागरीक त्रस्त होताना पाहून मध्यस्थी पुरवठा विभागाशी संधान साधून 2 ते 3 हजार घेवुन शिधापत्रिका मिळवुन देवुन कमाई करत आहेत. त्यामुळे नागरीकांना भुर्दड सोसावा लागत आहे.

Ration card news
Ahilyanagar Jal Jeevan Yojana: जलजीवन योजनेत गोंधळ; 918 कोटी खर्चूनही हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह

पुरवठा विभाग म्हणजे भ्रस्टाचाराचे केंद्र संबोधले जात होते. दरम्यान शासनाने नायब तहसिलदाराऐवजी पुरवठा निरीक्षक पदाची निर्मिती करुन त्याचेकडे स्वतंत्र पदभार दिला. पुरवठा निरीक्षणपदी प्रथमच रोहणकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर शिधापत्रिकेसाठी मध्यस्त सक्रिय असून मोठी रक्कम घेतात. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिधिपत्रिकेसाठी अर्जाची नोंदणी करुन त्याना क्रमांक देण्याची व निर्धारीत वेळेत त्याचे काम करण्याचे धोरण ठरवल्यामुळे मध्यस्थाची संख्या रोडावली आहे. दरम्यान नागरिक ही आपली तक्रार घेवुन गेल्यानंतर त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात असल्याने व पैसा खर्च करावा लागत नसल्याने नागरीकात समाधान व्यक्त केले जात आहे. पुरवठा निरीक्षकाच्या अधिपत्याखाली श्री शेख, वाघमारे, शंखपाळे, सुनिल चव्हाण, अविनाश जाधव, माधव गायकवाड हे कर्मचारी तेथे येणा-यांना सहकार्य करीत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news