Nanded News : पुढील आठवड्यात नगर परिषद - पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

जिल्हा परिषद - पंचायत समिती दुसऱ्या टप्प्यात
Nanded News
Nanded News : पुढील आठवड्यात नगर परिषद - पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा Pudhari Photo
Published on
Updated on

Nanded News: Announcement of municipal council and panchayat elections next week

नांदेड :

नांदेड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज होत अस लेला राज्य निवडणूक आयोग पुढील आठवडद्यामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणाच्या तयारीत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.

Nanded News
indira gandhi death anniversary : इंदिरा गांधींसाठी विमानतळ उभारले.. पण त्या कधी येऊ शकल्याच नाहीत...

सर्वोच्च न्यायालयाने वरील संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्यानंतर आयोगाने मागील दोन महिन्यांत वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. दिवाळी संपल्यानंतर आयोगाचा कारभार अधिक गतिमान झाला असून नोव्हेंबर ते जानेवारी २०२६ दरम्यान सर्व निवडणुका पार पडतील, असे नियोजन झाले आहे.

नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत केव्हाही होऊ शकते. त्याच दिवसांपासून त्या त्या नगर पालिका पंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होईल. या सर्व संस्थांच्या निवडणुकांकरिता मतदारवादी तयार झाली आहे, असे आयोगातील उव्यपदस्थ अधिकाऱ्याने शुक्रवारी स्पष्ट केले.

Nanded News
Nanded Crime News : रात्रीतून बेसुमार वाळू उपसा, शासनाची बंदी केवळ कागदावरच

विशेष दुसन्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन करण्यात आले आहे, पण या निवडणुकांची प्रक्रिया नगर पालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर होणार, का ही प्रक्रिया जारी असताना घोषणा केली जाणार, ते अद्याप नक्की झालेले नाही. जि.प. निवडणुकांसाठी मतदारयादीचे काम ३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबींचा आढावा घेऊन कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांची निवडणूक पार पाडली जाणार आहे. आतापर्यंतचे नियोजन विवारात घेता, सर्व संस्थांच्या निवडणुका निर्धारीत मुदतीत म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होतील, असा राज्य निवडणूक आयोगाचा अंदाज अहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली असून त्यासंबंधीचा आदेश २९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एका गटातील उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ९ लाख आहे. नांदेड मनपा निवडणुकीसाठी एवढीच खर्चमर्यादा राहील,

नांदेड जिल्ह्यात भोकर, मुदखेड, हदगाव, किनवट, उमरी, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, देगलूर, कंधार, लोहा या नगर परिषदा आणि हिमायतनगर नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाकडून घोषणा होताच या संस्थांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू होईल.

नगरपालिका अ वर्ग नगरपालिका थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला १५ लाख तर सदस्यपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. व वर्ग नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ११ लाख २५ हजार तर सदस्य पदाच्या उमेदवाराला ३ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे. क वर्ग नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख तर नगरसेवक पदाच्या उमेदवाराला अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख तर सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार अशी मर्यादा घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news