Nanded | नायगावात पाणी उशिरा येण्यावरून पंप ऑपरेटरला मारहाण; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pump operator assaulted Nanded | नायगावात पाणी उशिरा येण्यावरून पंप ऑपरेटरला मारहाण; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
water
waterfile photo
Published on: 
Updated on: 

नायगाव (नांदेड) : पाणी उशिरा का येते, असा जाब विचारत नगरपंचायतीच्या पंप ऑपरेटरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच खंजरने मारहाण केल्याची घटना नायगाव येथे घडली. ही घटना महात्मा फुले कॉलनी परिसरात दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. यावेळी पंप ऑपरेटरच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी नगर पंचायतीचे पंप ऑपरेटर मौला चांदसाब शेख (वय ४६, रा. जुनेगाव, नायगाव) यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक करण्यात आली.

water
Nanded Accident | उमरखेड-पुसद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षिकेचा मृत्यू

पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून पंप ऑपरेटर मौला शेख यांना पाणी उशिरा का येते, असा जाब विचारला. यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि खंजरने हातावर मारहाण करून दुखापत केली आणि मारहाणीच्या वेळी खिशातील दोन हजार रुपयांची रोकड काढून घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

water
Nanded Crime News | वडिलांना मृत्यूस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावत्रआईसह तिघांविरुद्ध गुन्हा

या घटनेनंतर मौला शेख यांनी नायगाव पोलिस ठाण्यात आरोपी साईनाथ धोंडीबा देवकांबळे (वय ३१), रवी धोंडीबा देवकांबळे (वय २३), संदीप धोंडीबा देवकांबळे (वय २८), सचिन धोंडीबा देवकांबळे (वय २०) आणि सुनिता धोंडीबा देवकांबळे (वय ५५), सर्व रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव,यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप कुलकर्णी देगलूरकर हे करीत आहेत.

आरोपीकडून फिर्याद देण्यात आली असून फिर्यादी याने घरात घुसून मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news