Nanded Crime News | वडिलांना मृत्यूस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावत्रआईसह तिघांविरुद्ध गुन्हा

नागापूर रूपाळा येथे ६० वर्षीय व्यक्तीने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले
 Crime News
Crime News file photo
Published on: 
Updated on: 

Nanded Umarkhed Stepmother Booked

उमरखेड : तालुक्यातील नागापूर रूपाळा येथे ६० वर्षीय व्यक्तीने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बुधवारी (दि. ७) पहाटे घडली. या प्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी सावत्रआईसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मारोती परसराम कांबळे (वय ६०) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मुलगा पवन कांबळे (वय २३) याने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून सुनीता मारोती कांबळे (वय ३५), दत्ता विनकरे (वय ४०, दोघे रा. नागापूर रूपाळा) आणि सारजाबाई दुधडकर (वय ७०, रा. विडूळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 Crime News
Nanded News | तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या गाडीचा अपघात : एक ठार, पाच जखमी

फिर्यादीनुसार, मारोती कांबळे यांचा किराणा व्यवसाय होता. सुनीता कांबळे आणि दत्ता विनकरे यांच्यात संबंध असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर मारोती यांनी सुनीता यांना समज दिली होती. या कारणावरून दत्ता विनकरे याच्याकडून कुटुंबीयांना धमक्या तसेच सुमारे दोन महिन्यांपूर्वी मारहाण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे मारोती कांबळे सतत तणावात व भीतीच्या वातावरणात राहत होते, असेही तक्रारीत नमूद आहे.

बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पवन याला वडील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. कुटुंबीयांनी त्यांना खाली उतरवून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या पॅन्टच्या खिशात हस्तलिखित चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत संबंधित तिघांमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी चिठ्ठी पंचांसमक्ष जप्त केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news