Illegal Liquor Transport Nanded: अवैध दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा दणका; एक लाखाच्या दारूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी ही दारू ताब्यात घेत कारसह सर्व मुद्देमाल जप्त केला
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

नायगाव : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी नायगाव पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलिसांनी २६ आगष्ट बुधवारी (दि.२६) रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली.

या कारवाईत विविध ब्रँडच्या तब्बल ४७७ दारूच्या बाटल्या, सुमारे १ लाख १ हजार ७९० रुपयांची दारू आणि ५ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नायगाव शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री तसेच वाहतुकीविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नायगाव पोलिस ठाण्याच्या पथकाला २६ ऑगस्ट रोजी रात्री नायगाव परिसरातून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Crime News
Nanded news: धर्माबादमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; दोघे ताब्यात, पाच जण पसार

या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वडजे हॉस्पिटलजवळ सापळा रचला. दरम्यान, एमएच १२ एनजे २३४६ क्रमांकाची कार संशयास्पदरीत्या त्या परिसरातून जाताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रँडची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारू ताब्यात घेत कारसह सर्व मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये मँकडॉवेल, क्लासिक, ब्लेंडर्स, मास्टर डिलाईट, मॅजिक, स्काय, व्हॅल्कन ब्ल्यू व्हिस्की, रॉयल स्टॅग आदी ब्रँडचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एकूण ४७७ बाटल्यांची किंमत सुमारे १ लाख १ हजार ७९० रुपये असल्याचे समोर आले आहे. दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार सुमारे ५ लाख रुपये किमतीची असल्याने जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख १ हजार ७९० रुपयांवर पोहोचली आहे.

Crime News
Nanded News : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शादिखान्याचे ना ऊर्दघर ना शादिखाना !

या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी (वय ४०, व्यवसाय हॉटेल, रा. घुंगराळा, ता. नायगाव), संजय शंकर बनवाड (रा. घुंगराळा, ता. नायगाव) आणि गणेश कर्क गणपती गोविंदराव जाधव (रा. रानसुगाव, हल्ली मु. नायगाव) यांच्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नायगाव तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा असतानाच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः परराज्यातील अथवा विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करून तिची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यापुढेही अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Crime News
Nanded Political News : ऋणानुबंधाच्या गाठी... केवळ भोकर अन् देगलूरसाठी !

पोलिस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सदाशिव पाटील, माधव पवार, दीपक शेरीकर आणि विनोद भंडारे यांनी केली. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत असून अवैध दारू विक्री व वाहतुकीवर आणखी कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news