Nanded news: धर्माबादमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; दोघे ताब्यात, पाच जण पसार

शहरातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी धर्माबाद पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे.
crime News
crime Newspudhari photo
Published on
Updated on

धर्माबाद: शहरातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी धर्माबाद पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात दोघांना ताब्यात घेतले, तर पाच जणांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. बाळापूर येथे ऑनलाइन मटक्यावरी पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

आंध्रा बस स्थानका जवळील एका इडली सेंटरच्या पाठीमागे मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलीस दिसताच जुगार खेळणाऱ्यांची धावपळ उडाली.

crime News
Mumbai Crime News: अश्‍लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत ७५ लाखांची वसुली; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

यावेळी शिवलिंग शंकर धावडे (५१ रा. हुनगुंदा ता. बिलोली), राहुल संपत झंवर (४४ रा. शंकर गंज धर्माबाद) यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र ओम गंजेवार (४५), राजू दूलोड उर्फ शेट्टी, सागर सन्नावार (४२), माजिद खान (३८) आणि विजय वारले हे पाच जण पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार झाले.

घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि दोन हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी आंध्रा बस स्थानक व बाळापूरच्या कोळी गल्लीत ऑनलाईन मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली होती. अनिल साईनाथ शेंबेटवार (३६ रा. महालक्ष्मी नगर, बाळापूर) आणि विष्णू इंगळे (रा. रामनगर धर्माबाद) यांच्याविरोध गुन्हा नोंद केला आहे.

crime News
Neral Crime News: गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारा जेरबंद; गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news