Nanded Crime : हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा

Nanded Crime : हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा
Published on
Updated on

हिमायतनगर : शहरातील उमरचौक परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक, हिमायतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 8 एप्रिल 2026 बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी एकत्र येत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावावर व काकावरही जीवघेणे वार करण्यात आले, ज्यामुळे तेही जखमी झाले आहेत.

या प्रकरणी शेख ईलीयास, शेख एजाज, शेख जावेद, शेख फेरोज, शेख अफरोज, शेख इम्रान उर्फ ईमु व शेख महेमुद उर्फ तहारी (सर्व रा. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news