

नायगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने शनिवारी (ता. ८) रात्री धडाकेबाज कारवाई करत दोन हायवा पकडले. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या पथकाने ही कारवाई करत तब्बल ३३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध नायगाव व कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात एकही वाळू घाट सुरू नसतानाही दिवसरात्र बिनदिक्कत वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांनी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांच्यासह कारवाईचा सपाटा लावला.
नायगाव ठाण्याच्या हद्दीत नांदेड रोडवरील माउली पेट्रोल पंपाजवळ (एमएच ०३ सीपी ६९२१) क्रमांकाचा हायवा अडवून तपासणी केली असता त्यात विनापरवाना वाळू आढळली. हायवा ताब्यात घेऊन नायगाव ठाण्यात लावण्यात आला. त्यानंतर कुंटूर ठाण्याच्या हद्दीतील बरबड्याजवळ (एमएच १४ एचयू ६४५५) क्रमांकाचा दुसरा हायवा पकडण्यात आला. चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याने वाहन कुंटूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी गोपीराज धोंडिबा हंबर्डे (रा. वाका, ता. लोहा), मुनीम मारोती अशोक पुरी (रा. पेंबर, ता. भोकर), पांडुरंग अवधूत कदम व गणपती रघुनाथ कदम (दोघे रा. शंकतीर्थ, ता. मुदखेड) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, महसूल विभाग आणखी मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आसली तरी काही गाड्या सोडून दिल्या जात आहे.यांवर चर्चा कोणासोबत करावी हा प्रश्न आहे.
गोधमगाव शिवारातून दररोज रात्री होते अवैध मुरूमा ची तस्करी या वर नायगाव महसूल पथक,महसूल प्रशासन गप्प आहे या मुळे शंकेला कारण ठरत असून एकीकडे काही विशिष्ट लोकांना मोकळीक तर काही ठिकाणी कार्यवाहीची बाधा यातून काही निष्पन्न होत नाही अशी उलट सुलट चर्चा होत आहे.करायचे तर सर्वत्र कार्यवाही हाच पर्याय होय अशी चर्चा रंगत दार