Illegal Sand Transport : अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त

गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली
Illegal Sand Transport
Illegal Sand Transport : अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त File Photo
Published on
Updated on

Truck transporting illegal sand seized

नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, एकूण ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख आसीफ शेख अजगर यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Sand Transport
Solar Energy : आवाहनानंतर नांदेड परिमंडळात ४५ मेगावॅट सौर ऊर्जा होते तयार

नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते. विष्णुपुरी येथे ते आले असता त्यांना पिंपळगाव निमजी येथून अवेध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तेथे जावून हायवा (एमएच-२६, बीडी-१२१३) तसेच चार ब्रास रेती असा एकूण ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Illegal Sand Transport
Nanded News : लोहा तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार

आरोपी स्वप्नील दिलीप चौदंते (रा. मुदखेड), सचिन कदम (रा. जानापुरी) यांच्यावर नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, वसंत केंद्रे, विष्णू कल्याणकर, संतोष पवार, मारोती पचलिंग, जमीर शेख, धम्मपाल कांबळे आदींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news